हायकमांड सोबतची कॉंग्रेस नेत्यांची बैठक पुढे ढकलली

हायकमांड बरोबरची काँग्रेस मंत्र्यांची बैठक पुढे ढकलली



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

*_बैठकीबाबत नाना पटोलेंचे महत्त्वाचे वक्तव्य_*

विशेष प्रतिनिधी

मुंबई :- महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) कॉंग्रेस नाराज असल्यामुळे काँग्रेस हायकमांडने आज महाराष्ट्रातील प्रमुख मंत्र्यांची दिल्लीत तातडीची बैठक बोलावली होती.

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस एकाकी पडली होती. तसेच राष्ट्रवादीने काँग्रेसची वेळोवेळी कोंडी केली. काँग्रेसचे नगरसेवक फोडले. आमदार निधीमध्ये भेदभाव केला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. या सर्व आरोपांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांची नाराजी टोकाला पोहोचली आहे. याच मुद्द्यावर ‘महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचे स्थान’ या विषयावर दिल्लीत महत्वाची बैठक होणार होती. मात्र, दिल्लीतील हायकमांड बरोबर कॉंग्रेस मंत्र्यांची बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून बैठक नेमकी कशासाठी बोलावण्यात आली होती, हे देखील सांगितले आहे. राज्य सरकराची अडीच वर्ष यावर ही चर्चा होणार असल्याचे सांगत महागाई आणि इतर विषयांवर ही बैठक होणार होती असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना बोलावण्यात आलेले नाही, अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles