भारतीय बौद्ध महासभेची दोन्ही गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न

भारतीय बौद्ध महासभेची दोन्ही गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची संयुक्त बैठक संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_महाउपासिका मीराताई आंबेडकर राष्ट्रीय संरक्षक_

हैदराबाद – डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली बौद्धांची शिखर संघटना दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे मीराताई आंबेडकर/भीमराव आंबेडकर आणि पी जी ज्योतीकर / चंद्रबोधी पाटील गटाचे एकत्रीकण होऊन धर्मादाय आयुक्त यांच्याकडे तसा चेंज रिपोर्ट दाखल करून दोन्ही गटाच्या राष्ट्रीय कार्यकारणीची एकत्रित बैठक हैदराबाद येथील दि सेंट हॉटेल येथे 31 मे 2022 रोजी राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

सुरवातीला राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी बैठकीच्या विषयावर संस्थेची भूमिका विषद करून येणाऱ्या 2025 मध्ये भारतीय बौद्ध महासभा करोड लोकांचा धर्मांतर करणार आहे त्यासाठी सर्वांनी कामाला लागावे व भारतीय बौद्ध महासभेची एकिकृत राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित केली जाईल असे सांगितले.

समता सैनिक दल स्वतंत्र राहील भारतीय बौध्द महासभा समता सैनिक दल वाढविण्यास मदत करेल व समता सैनिक दलाचे भारतीय बौध्द महासभेला सहकार्य राहील असे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने सांगितले. या बैठकीत महाउपसिका मीराताई आंबेडकर यांना भारतीय बौध्द महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक म्हणून एकमुखाने ठराव करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी संस्थेची नवीन राष्ट्रीय कार्यकारणी लवकरच घोषित केली जाईल व त्यामध्ये 10 राष्ट्रीय उपाध्यक्ष व 10 राष्ट्रीय सचिव राहतील व धम्म प्रचार प्रसारासाठी भारताचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर असे भाग करून त्याप्रमाणे ट्रस्टी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात येणार असून कार्यकारणीत महिलांनाही स्थान देण्याचे ट्रस्टीनी ठरविले असल्याचे सांगितले.

ट्रस्टी चेअरमन डॉ हरीश रावलीया यांनी भारतीय बौद्ध महासभा आतंरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन केले. बैठकीत विविध पदाधिकारी यांनी मांडलेल्या सूचना, प्रस्तावाच्या अनुषंगाने ट्रस्टी कॅप्टन प्रविण निखाडे यांनी शिस्त पालन कमिटी, ऑडिट कमिटी, प्रशिक्षण विभाग आणि महिला विभाग, प्रसिध्दी विभाग,आतंरराष्ट्रीय विभाग या प्रमाणे विविध विभाग असतील असे सांगितले. तसेच ट्रस्टी/ राष्ट्रीय कोषाध्यक्ष धम्मरतन सोमकुंवर(भोपाळ, मध्यप्रदेश ), ट्रस्टी प्रा. एस आर कांडे (दुर्ग, छतीसगड) , ट्रस्टी इंजि. एस डी भास्कर (बरेली, उत्तरप्रदेश) यांनी आपले विचार मांडले.

शेवटी भारतीय बौद्ध महासभेची एकत्रित सर्वसमावेशक राष्ट्रिय कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार राष्ट्रिय कार्याध्यक्ष व राष्ट्रीय अध्यक्ष यांना देण्यात आल्यानुसार लवकरच घोषणा केली जाईल तोपर्यंत ज्या स्थितीत कामकाज चालू आहे त्याप्रमाणे काम चालू ठेवावे असे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील यांनी सांगितले. बैठकीचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सरचिटणीस शंकर डोंगरे यांनी केले.

बैठकीसाठी भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघ, दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणी पदाधिकारी, सदस्य व विविध राज्यातील अध्यक्ष, सरचिटणीस समता सैनिक दलाचे अधिकारी इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे आयोजन भारतीय बौद्ध महासभेच्या तेलंगणा राज्य शाखेने केले होते. तेलंगणा राज्य शाखे च्यावतीने 10 वे बौध्द महा संमेलन मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीत संपन्न झाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles