‘राज’ कारणाचा आरसा ? म्हणजेच – (ना)राजीनामा

‘राज’ कारणाचा आरसा ? म्हणजेच – (ना)राजीनामापुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_प्रकाशझोतात राहण्यासाठी देशमुखांची ही राजकीय स्टंटबाजी !_

नागपूर :- वडील काँग्रेसचे मोठे नेते असले तरी त्यांची राजकीय कारकीर्द भाजपमधून सुरू झाली. मात्र, प्रकाशझोतात राहण्यासाठी त्यांनी २०१८ मध्ये स्वतंत्र विदर्भाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला रामराम ठोकला. हे दुसरे तिसरे कुणी नसून विदर्भातील कॉंग्रेसचे बडे प्रस्थ माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजीत देशमुख यांचे पुत्र डॉ. आशीष देशमुख. राजीनाम्याचे हे सत्र म्हणजे राजकारणाचा ‘आरसा’ असून अशी स्टंटबाजी करण्याची ही जुनीच सवय असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

डॉ. आशीष देशमुख यांचा पिंडच पक्ष नेतृत्वाला आव्हान देण्याचा असल्याचे त्यांच्या कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीसपदाचा राजीनामा देण्याच्या कारणावरून दिसून येते. काँग्रेसने महाराष्ट्रात राज्यसभेची उमेदवारी उत्तरप्रदेशचे इमरान खान प्रतापगडी यांना दिल्याने आशीष देशमुख यांनी पक्षनेतृत्वाला आव्हान देत (ना)राजीनामा देण्याची व त्यातून प्रसिद्धीच्या झोतात येण्याची परंपरा कायम ठेवली आहे. भाजपमधून आपली राजकीय कारकीर्द सुरु करणारे डॉ. आशिष देशमुख यांनी त्यांचे काका माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविली. या निवडणुकीत अनिल काकांचा पराभव करत त्यांनी विधानसभेची पहिल्यांदाच पायरी चढली. पण कॉंग्रेसच्या कुशीत राजकारणाचे बाळकडू घेतलेल्या आशीष देशमुखांना भाजपच्या संस्कृतीत रुळता आलेच नाही. स्वतंत्र विदर्भाचा आणि शेतकऱ्यांचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चक्क भाजपला सोडचिठ्ठी दिली.

“सुबह का भुला अगर शाम को घर आ जायें तो उसे भुला नहीं कहते” या वाक्यानुरूप त्यानतर त्यांनी वर्धा येथील एका कार्यक्रमात कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कॉंग्रेस मध्ये घरवापसी केली. काँग्रेसमध्ये आल्यावर त्यांनी २०१९ च्या लोकसभेच्या उमेदवारीसाठी जोरकस प्रयत्न केले. परंतु ते सिद्धीस गेले नाही. मात्र, नंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना थेट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात उमेदवारी दिली. ऐनवेळी मिळालेल्या उमेदवारीने फडणवीस यांना जोरदार टक्कर दिल्यानंतरही त्याना ही निवडणूक जिंकता आली नाही. आता राज्यसभेच्या उमेदवारीवरून थेट सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना राजीनामा पाठवून त्यांच्या व कॉंग्रेसच्या कार्यपद्धतीवर आशीष देशमुख यांनी टीका केली आहे. देशमुख यांना काँग्रेसमध्येही पक्षांतर्गत गटबाजीला तोंड द्यावे लागले आहे. भाज्पासी काडीमोड घेत त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने नागपूर जिल्ह्यात देशमुख विरुद्ध केदार वादाला तोंड फुटले होते. जिल्हा बँक घोटाळ्याच्या जुन्या मुद्यावरून देशमुख यांनी कॉंग्रेसचे महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री सुनील केदार यांच्या राजीनाम्याची मागणी करून खळबळ उडवून दिली होती. एकंदरीत त्यांची राजकीय कारकीर्द बघता त्यांचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन “जिधर दम – उधर हम’ अर्थात धरसोडीचे असल्याचा दिसून येतो.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles