राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल पाचव्यांदा तर शिवसेनेचे संजय राऊत चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात

राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल पाचव्यांदा तर शिवसेनेचे संजय राऊत चौथ्यांदा निवडणूकीच्या रिंगणात



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

मुंबई: राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल हे पाचव्यांदा तर शिवसेनेचे संजय राऊत हे चौथ्यांदा राज्यसभेच्या रिंगणात उतरले आहेत. राज्यातून काँग्रेसच्या सरोज खापर्डे यांनी आतापर्यंत सर्वाधिक पाच वेळा राज्यसभा सदस्यत्व भूषविले आहे.

राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीकरिता सहा जागांसाठी सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राऊत यांनी २००४ पासून १८ वर्षे राज्यसभेची खासदारकी भूषविली आहे. या निवडणुकीत निवडून आल्यावर ते लागोपाठ चौथ्यांदा राज्यसभेचे खासदार होतील.

प्रफुल्ल पटेल यांनी लोकसभा व राज्यसभा अशा संसदेच्या उभय सभागृहांचे सदस्यत्वपद भूषविले आहे. पटेल यांची राज्यसभेची ही चौथी खेप होती. पटेल हे २००० ते २००६ या काळात पूर्ण सहा वर्षे राज्यसभेचे सदस्य होते. २००६ मध्ये त्यांची राज्यसभेवर फेरनिवड झाली. २००९ मध्ये त्यांची लोकसभेवर निवड झाल्याने राज्यसभा सदस्यत्वपद रद्द झाले. २०१४ मध्ये पोटनिवडणुकीत ते पुन्हा राज्यसभेवर निवडून गेले. २०१६ ते २०२२ अशी सहा वर्षे त्यांनी परत खासदारकी भूषविली. आतापर्यंत दोनदा पूर्ण सहा वर्षे तर दोनदा कमी कालावधी त्यांना मिळाला.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles