बिहारप्रमाणे महाराष्ट्रानेही जातीनिहाय जनगणना करावी; प्रा.उमेश सिंगनजुडे

बिहारप्रमाणे महाराष्ट्रानेही जातीनिहाय जनगणना करावी; प्रा.उमेश सिंगनजुडे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

लाखनी: महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. शिक्षण नोकरी व राजकीय क्षेत्रात लोकसंख्येच्या प्रमाणात कायमस्वरूपी आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने केवळ इम्पेरिकल डाटा गोळा न करता ओबीसी समाजाची जातिनिहाय जनगणना करावी अशी मागणी ओबीसी जनगणना परिषदेचे जिल्हा समन्वयक प्राध्यापक उमेश सिंगनजुडे यांनी केली आहे.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र, मध्यप्रदेश सह अनेक राज्यात निर्माण झाला .मध्यप्रदेशच्या शिवराजसिंह चौहान सरकारने इम्पेरिकल डेटा दिल्याने तेथील राजकीय आरक्षण कायम झाले. परंतु महाराष्ट्र सरकारने अजून पर्यंत इम्पेरिकल डाटा गोळा न केल्याने अनेक निवडणुका ओबीसी आरक्षणा शिवाय होत आहेत.
*पिछाडा पावे सौ मे साठ* या डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या मंत्राशी प्रतिबद्ध असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमध्ये *जातिनिहाय जनगणना* चा निर्णय घेतला आहे .या निर्णयाचे सर्वच पक्षांनी आणि ओबीसी समाजाने स्वागत केले आहे.

सुप्रीम कोर्टाच्या 2010च्या ट्रिपल टेस्ट निर्णयानंतर ओबीसींची सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाची पाहणी करणे आवश्यक होते .परंतु महाराष्ट्र राज्यात ा प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करण्यात आले या काळात सर्वच पक्ष सत्तेत आली पण सर्वांनीच ओबीसींच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले त्यामुळे आज ओ बी सी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे .केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेची मागणी फेटाळून लावली असली, तरी राज्यसरकारला जनगणना करण्याचा पर्याय खुला ठेवला आहे.बिहार सरकारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी तो मार्ग स्वीकारून बिहार मध्ये जातीनिहाय जनगणनेची घोषणा केली. बिहार सरकार चा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्र सरकारने केवळ इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचा प्रयत्न न करता जातीनिहाय जनगणनेची घोषणा करावी व कित्येक वर्षांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपुष्टात आणून ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यावे. ठाकरे सरकार बिहार सरकार प्रमाणे जातीनिहाय जनगणनेची घोषणा कधी करेल याकडे महाराष्ट्रातील संपूर्ण ओबीसी बांधवांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles