

ज्वाला धोटेंच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनी ‘वृक्षारोपण’
नागपूर: शहरातील दक्षिण नागपूर परीसरात विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्षा ज्वाला जांबुवंतराव धोटे यांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशनला आज दि ५ जून रोजी सदिच्छा भेट दिली.
दि ५ जून या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राजूभाऊ रहाटे यांच्या पुढाकारातून पोलिस स्टेशन च्या प्रांगणात वृक्ष रोपण करण्यात आले. या प्रसंगी हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरिक्षक कविता इसारकर उपस्थित होत्या.