पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्मा शांत होईल

पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्मा शांत होईलपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_संजय राऊतांचा ‘रोखठोक’मधून केंद्र सरकारवर हल्लाबोल_

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात ईडीच्यावतीने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना नोटीस बाजावली आहे.यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी सामनाच्या रोखठोकम सदरातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटले की, नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते त्यामध्ये नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता. नेहरू आक्रमक असल्याने कोणत्याही टिकेला घाबरत नव्हते. आता या प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधींना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यांच्यानंतर खुद्द पंडित नेहरूंना ED ची नोटीस बजावल्यानंतरच काहींचा आत्मा शांत होईल. हेराल्ड म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे हत्यार होते. नेहरुंनी ते निर्माण केले. ती फक्त संपत्ती नव्हती. राजकारणातील सध्याच्या व्यापाऱ्यांना हे कधी समजणार? नॅशनल हेराल्डचे राजकीय महत्त्व अद्याप कमी झालेले नाही. पण त्यावरून देशात राजकारण सुरू आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे.

नॅशनल हेराल्ड हे वर्तमानपत्र पंडित नेहरूंनी सुरू केले होते. ते वृत्तपत्र सुरू करण्यामागे इंग्रजांना देशातून हाकलून देणे हा हेतू होता. स्वातंत्र्य लढ्यात जहाल मुखपत्र म्हणून हेराल्डची ओळख होती. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांच्या विरोधात काय सुरु आहे याची माहिती जाणून घेण्यासाठी लोक हेराल्ड वृत्तपत्र वाचत होते. नेहरूंच्या या वृत्तपत्राचा इंग्रजांनी इतका भयानक धसका घेतला की, त्यांनी 1942 च्या ‘भारत छोडो’ आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेराल्डवर इंग्रजांनी बंदीच घातली होती. आता या वृत्तपत्रातील गैरव्यवहार प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधी यांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे.

संजय राऊत यांनी ‘नॅशनल हेराल्डबाबत आपली भूमिका मांडली असून त्यांनी म्हंटले आहे की, नॅशनल हेराल्ड हे एकेकाळी काँग्रेसचे सामर्थ्य होते. त्यामध्ये नेहरूंचा आत्मा त्यात गुंतला होता. नेहरू आक्रमक असल्याने कोणत्याही टिकेला घाबरत नव्हते, असेही राऊत म्हणाले .

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles