उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र हिंगणा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि ०६ जून २०२२ रोजी एम.सी.ई डी. उपकेंद्र हिंगणा येथे एक महिना अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाटन डॉ. बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी आलोक मिश्रा विभागीय प्रकल्प अधिकारी एम.सी.ई डी. नागपूर, प्रमुख उपस्थिती म्हणून हेमंत वाघमारे राज्य समन्वयक, आणि केंद्र प्रमुख/ प्रकल्प अधिकारी एम.सी.ई डी. हिंगणा, कार्यक्रमाचे अतिथी विनायक इंगळे जेष्ठ पत्रकार हिंगणा, मा. हृदय गोडबोले समतादूत प्रकल्प अधिकारी, हिंगणा तालुका समतादूत सतीश सोमकुंवर यांनी स्थान भूषविले.

ई. डी. पी. प्रशिक्षणार्थ्यांना बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले, की युवक युवतींनी उद्योग क्षेत्राकडे आपला कल ओढवून आपली प्रगती साधावी, त्या साठी आपल्या मनाची पूर्ण तयारी करुन स्वता:ला व्यवसायात झोकेन देवून काम केल्यास आपणही यशस्वी उद्योजक होवू शकता, बार्टी व एम.सी.ई डी. आपल्याला मार्गदर्शना करिता सहाय्यता करेल अशी हमी धम्मज्योती गजभिये महासंचालक बार्टी पुणे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना दिली.

तसेच आलोक मिश्रा विभागीय प्रकल्प अधिकारी एम.सी.ई डी. नागपूर यांनी सुद्धा उद्योजकता विकास कार्यक्रमा संदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमंत वाघमारे, सूत्रसंचालन समतादूत सतीश सोमकुंवर तर आभार सुषमा चोरपगार यांनी मानले. कार्यक्रमाला समतादूत अमोल खवसे, अल्ताफ कुरेशी, मंजूषा मडके, प्रार्थना दिवे, एम.सी.ई डी. चे समन्वयक सुषमा चोरपगार, संगीता ढोणे, पंकज ठाकरे तसेच ई. डी. पी. प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles