‘चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, शरद पवारांनी केले फडणवीसांचे कौतुक’

‘चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे, शरद पवारांनी केले फडणवीसांचे कौतुक’



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

राज्यसभेच्या पहाटेपर्यंत लांबलेल्या निकालात अखेर भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला. अत्यंत चुरशीची झालेली ही निवडणूक अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजली आहे.

दरम्यान, या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना निकालाने मला धक्का बसलेला नाही असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, “मतांची संख्या पाहिली तर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस यांच्या उमेदवारांना जो कोटा दिला त्यात काही फरक नाही. प्रफुल्ल पटेलांना एक मत जास्त पडलं. ते मत आघाडीचं नाही तर दुसऱ्या बाजुचं आहे.” राज्यात राज्यसभेच्या सहा जागा होत्या, त्यासाठी सात उमेदवार उभा होते. यात सहावी जागा जिंकण्यात भाजपला यश आलं. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, “सहावी जागा सेनेनं सीट लढवली. त्यासाठी मतांची संख्या कमी होती तरी तिथं धाडस केलं आणि प्रयत्न केला. त्यात अपक्षांची संख्या भाजपकडं अधिक होती, ती दोघांना पुरेसी नव्हती. भाजपने अधिक मतं मिळवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालं.”

फडणवीसांचे विशेष कौतुक करताना पवार म्हणाले, अपक्षांना आपल्या बाजूने घेण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली. आघाडीच्या उमेदवारांना योग्य मते मिळाली. पण यामध्ये चमत्कार झाला तो मान्य केला पाहिजे. फडणवीस यांना माणसं आपलीशी करण्यात विविध मार्गाने यश आलं आहे, एवढं मात्र नक्की असे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles