खेळाडूंचा आहार व मानसिक तंदूरुस्तीची काळजी घेणे गरजेचे

खेळाडूंचा आहार व मानसिक तंदूरुस्तीची काळजी घेणे गरजेचेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

– डॉ. श्रीदर्शन देसाई यांचे प्रतिपादन

नागपूर: खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये उच्चतम कामगिरी करण्यासाठी खेळाडूंच्या सरावासोबतच त्यांच्या आरोग्याची, आहाराची व मानसिक तंदूरुस्तीची काळजी प्रशिक्षकांनी घेणे गरजेचे असल्याचे मत क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागीचे माजी संचालक डॉ. श्रीदर्शन देसाई यांनी केले.

जैन विद्यापीठ, बंगलोर येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया विद्यापीठ गेम्स मध्ये सहभागी झालेल्या नागपूर विद्यापीठाच्या कामगिरी विश्लेषणाचा कार्यक्रम विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या कार्यालयात नुकताच पार पडला. या कार्यक्रमात अतिथी म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले, की स्पर्धेत उपयोगात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स क्रीडा साहित्यांची सवय खेळाडूंना होणे गरजेचे असून त्याचे मार्गदर्शन खेळाडूंना व्हावे असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात प्रसिद्ध भौतिकोपचार तज्ज्ञ डॉ. केवीन अग्रवाल, विद्यापीठ क्रीडा विभागाचे माजी संचालक डॉ. धनंजय वेळुकर, आहारतज्ज्ञ डॉ. मेघना कुमरे, भारतीय खेळ प्राधिकरणाचे माजी क्षेत्रीय संचालक रुपकुमार नायडू, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे माजी सहसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, राणी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स, ग्वाल्हेर कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अनिल करवंदे, विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या सदस्या डॉ. विशाखा जोशी, ज्यूपीटर शारीरिक शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव भगत, धनवटे नॅशनल कॉलेजचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. देवेंद्र वानखेडे, नबीरा महाविद्यालय, काटोलचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. तेजसिंह जगदळे, विद्यापीठाच्या खेलो इंडिया पथकाचे प्रमुख डॉ. मनोज आंबटकर, विद्यापीठ योगासन पुरुष संघाचा कर्णधार शुभम वंजारी, महिला संघाची कर्णधार कल्याणी चुटे, खेलो इंडिया पथकाची ध्वजधारक रिषिका बदोले आणि क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शरद सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पॉवरपॉईंट सादरीकरणाद्वारे डॉ. अमित टेंभूर्णे यांनी विद्यापीठाच्या क्रीडापटूंची कामगिरी उपस्थितांसमोर सादर केली. व्हिडीओ अ‍ॅनालिसीसच्या माध्यमातून क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे माजी संचालक डॉ. देसाई यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.

तर आपल्या मार्गदर्शनात डॉ. जयप्रकाश दुबळे म्हणाले, पदकांची संख्या वाढविण्यासाठी प्रशिक्षकांसोबत क्रीडा भौतिकोपचार तज्ज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, क्रीडा आहारतज्ज्ञाची नियुक्ती होणे गरजेचे आहे. भार प्रशिक्षणाचा सराव वयोगटानुसार वेगळा असावा. सरावाची वारंवारिता महिला व पुरुष खेळाडूंसाठी वेगवेगळी असावी असे त्यांनी सांगितले. सांघिक खेळापेक्षा वैयक्ति खेळावर अधिक लक्ष्य दिल्यास पदकांच्या संख्येत वाढ होवू शकते. भारतीय खेळ प्राधिकरणाचे खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समधील पदक विजेत्या खेळाडूंवर विशेष लक्ष आहे. त्यांना येत्या काळात मोठी संधी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मिळणार आहे. विद्यापीठाने अ‍ॅथलेटिक्स, जलतरण, वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंग, ज्युदो, कराटे, बॅडमिंटन आदी वैयक्ति खेळांवर लक्ष केंद्रीत करावे असे मत रुपकुमार नायडू यांनी व्यक्त केले.

स्पोर्ट्स सायन्ससच्या मदतीने खेळाडूंच्या कामगिरीत कमालीची सुधारणा करता येते. ऑलिम्पिक पदक विजेत्या खेळाडूंचे कामगिरीमध्ये तेथील प्रशिक्षकांसोबत क्रीडा वैद्यक तज्ज्ञांचे योगदान मोठे आहे. कन्डीशिनिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगवर प्रशिक्षकांनी विशेष भर दिला पाहिजे असे मत डॉ. करवंदे यांनी व्यक्त केले. खेलो इंडिया विद्यापीठ गेम्समध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंनी आपले क्रीडा कारकिर्दीचे पुढील पाच वर्षाचे नियोजन करणे आवश्यक आहै. आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा आणि पुढे ऑलिम्पिक्स स्पर्धा असा टप्पा गाठावयाचा असल्यास तत्पूर्वी कोणत्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी व्हावे याचा आराखडा खेळाडूंकडे तयार असा असे मत डॉ. धनंजय वेळुकर यांनी व्यक्त केले.

भारतातील महिला खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पदके मिळविण्याची मोठी संधी आहे. आशियाई व राष्ट्रकूल पदक विजेत्या मध्येही महिलांची संख्या मोठी आहे. ऑलिंम्पिक पात्रता गाठणाऱ्या मध्येही महिलांची संख्या पुरुषांच्या बरोबरीने आहे. यापासून स्थानिक महिला खेळाडूंनी प्रेरणा घ्यावी असे मत डॉ. विशाखा जोशी यांनी व्यक्त केले.

डॉ. मेघना कुमरे म्हणाल्या, खेळाडूंच्या कामगिरीत आहाराचे खूप महत्व आहे. अगदी सरावाचे वेळी काय खावे, सरावनंतर काय खावे, यांचे नियोजन व्यक्तीपरत्वे असावे, स्पर्धेपूर्वी कोणता आहार घ्यावा हे सुद्धा खूप महत्वाचे आहे. ऋतुनुसार आणि सरावाच्या तीव्रतेनुसार आहार असावा असे त्यांनी सांगितले. नियोजनात्मक सराव, योग्य विश्रांती, खेळानुरुप आहार, स्वयंशिस्त आणि मानिक कणखरता हे गुण आंतरराष्ट्रीय पदक विजेते होण्यासाठी आवश्यक आहे, ते आपल्या मध्ये कसे येतील याचा विचार विद्यापीठस्तरीय खेळाडूंनी करावा. आपल्या ध्येय्यावर लक्ष केंद्रीत करावे आणि त्यासाठी आपल्या जीवनशैलीत योग्य तो बदल करावा असे मत डॉ. शरद सुर्यवंशी यांनी व्यक्त केले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीप्रपज्वलन करण्यात आले. आयोजन समितीेचे अध्यक्ष डॉ. संजय चौधरी यांनी पाहूण्यांचे स्वागत केले. वंदे मातरम डॉ. आदित्य सोनी, शिवम सोनी आणि कृतिका सोनी यांनी सादर केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. संचालन डॉ. सोनाली सिरभाते यांनी तर आभार डॉ. सुधीर सहारे यांनी मानले.

याप्रसंगी पूर्व प्रभारी क्रीडा संचालक प्रा. रवींद्र पुंडलिक, प्रा. आत्माराम पांडे, डॉ. कल्पना जाधव यांच्यासह डॉ. अविनाश तितरमारे, डॉ. श्रीराम आगलावे, डॉ. जयकुमार क्षीरसागर, डॉ. प्रवीण लामखेडे, प्राचार्य डॉ. अशोक कापटा, प्राचार्य डॉ. विबेकानंद सिंग , डॉ. पुर्णिमा कापटा, डॉ. पराग बन्सोले यांच्यासह विद्यापीठ प्रशिक्षण केंद्राचे प्रशिक्षक युगबहादूर छेत्री, विजय घिचारे, जीत ठाकरे, सायली वाघमारे, डॉ. धीरज भोस्कर, जयेंद्र ढोले, अर्चना कोट्टेवार, गणेश वाणी आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles