
नागलवाडी येथे गजानन महाराज मंदिरात नि:शुल्क कार्यशाळेचे आयोजन
नागपूर: श्री सद्गुरू गजानन महाराज सेवाश्रमाच्या सामाजिक उद्दिष्टपूर्ती निमित्त विश्वस्तानी रविवार दिनांक १९ जून रोजी मंदिरात सकाळी ९ ते ११ पर्यंत हिंगणा तालुक्यातील नागलवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात एक दिवसीय निःशुल्क कार्यशाळा आयोजित केली आहे.
नव्या पिढीला competitive परीक्षांमध्ये यश मिळावं ह्या उद्देशाने सेवाश्रम सामाजिक क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकीत आहे. हे उद्देश्य पूर्णत्वास नेण्याकरिता व अधिकाधिक मुलामुलींना ह्या कार्यक्रमाचा लाभ व्हावा ह्याकरिता आपल्याला जवळपासच्या गावात ह्या कार्यशाळेचा प्रचार करणे गरजेचे आहे. आपणास विनंती करण्यात येते कि या कार्यक्रमाला यशस्वी करण्या करिता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करावे.