डाॅ. म. न. पोटभरे यांना मानद डाॅक्टरेट प्रदान

डाॅ. म. न. पोटभरे यांना मानद डाॅक्टरेट प्रदान



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_डाॅ. पोटभरे यांना डाॅक्टरेट देताना डाॅ. देशमुख आणि प्रा. नाखले_

नागपूर: डाॅ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांनी 1950 साली स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठाची डाॅक्टरेट आ़ॅफ सोशल सायन्सेस ही मानद उपाधी ज्येष्ठ पशुवैद्यक, पशुसंवर्धन खात्याचे माजी सहआयुक्त डाॅ. म. न. पोटभरे यांना नुकतीच प्रदान करण्यात आली.

लोकविद्यापीठाचे महासंचालक डाॅ. मंगेश देशमुख आणि कुलसचिव प्रा. गंगाधर नाखले यांनी अमरावतीहून नागपुरात येऊन ही उपाधी बहाल केली. कुलगुरू डाॅ. रमेश ठाकरे परदेशात गेल्यामुळे हा कार्यक्रम घरगुती स्वरूपात घेण्यात आला. रवीन्द्र संगीत गायिका अरुंधती देशमुख यावेळी अध्यक्षस्थानी होत्या.
नवीन पिढीला प्रेरणा मिळावी या हेतूने समाजसेवी सेवानिवृत्त नागरिकांचा गौरव आम्ही करतो, असे डाॅ. देशमुख यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

सन 2000 पासून “आत्मा” संस्थेशी जुळलेल्या आमच्या लोकविद्यापीठाने आतापर्यंत 6 जणांना ही डाॅक्टरेट दिली असून पहिले मानकरी हरित क्रांतीचे जनक डाॅ. स्वामीनाथन होते. 86 वर्षांचे डाॅ. पोटभरे आजही उत्साहाने ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत असतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. या छोटेखानी अनौपचारिक सोहळ्याला पोटभरे यांच्या पत्नी नम्रता, दोन कन्या यांच्यासह कुटुंबीय, पत्रकार विनोद देशमुख आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles