Home ताज्या घटना केंद्रातील हुकूमशाहीचा लोकशाही मार्गानेच काटा काढू; नाना पटोले

केंद्रातील हुकूमशाहीचा लोकशाही मार्गानेच काटा काढू; नाना पटोले

41

केंद्रातील हुकूमशाहीचा लोकशाही मार्गानेच काटा काढू; नाना पटोलेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_’हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे’_

मुंबई: काँग्रेस पक्ष, सोनिया आणि राहुल गांधी हुकूमशाही करता-या भाजप सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडकवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु अशा हुकूमशाहीचा काँग्रेस पक्ष लोकशाहीच्या मार्गाने काटा काढून, चोख उत्तर देईल. ‘हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे, असा कडक इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला.

ज्या गांधी कुटुंबाने देशासाठी सर्वस्व अर्पण केले, त्याग केला, बलिदान दिले त्या कुटुंबाला बदनाम करण्यासाठी खोट्या व बनावट प्रकरणात त्यांना अडकवण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव आहे. केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून आमचा आवाज दडपण्याचा भाजपा सरकार प्रयत्न करत आहे पण अशा दडपशाहीला काँग्रेस पक्ष भिक घालत नाही. केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ईडीची नोटीस पाठवून दडपशाही करणा-या केंद्र सरकारविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढून तीव्र निषेध करण्यात आला.

जनता सरकारनेही इंदिरा गांधी यांच्याविरोधात अशीच कारवाई केली होती, आता भाजपा सरकार तेच करत आहे पण अहंकारी, अत्याचारी भाजपा सरकारसमोर काँग्रेस कधी झुकली नाही व यापुढेही झुकणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.