आंतरजिल्हा तायकांडो स्पर्धेत गोंदियास ६ सुवर्ण व १ रजत पदक

आंतरजिल्हा तायकांडो स्पर्धेत गोंदियास ६ सुवर्ण व १ रजत पदक



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गोंदिया : नुकत्याच यवतमाळ येथे झालेल्या आंतरजिल्हा तायकांडो स्पर्धेत गोंदिया जिल्ह्यातील चमुला 6 सुवर्णपदक व 1 रजतपदक मिळाले आहे. गोंदिया जिल्ह्याची चमू ही प्रशिक्षक ओमेश्वर तांडेकर, धर्मेंद्र दमाहे व निखिल डोंगरे यांचेसह सहभागी झाले होते.

गोंदिया जिल्ह्यातील 10 विद्यार्थी प्रशिक्षक ओमेश्वर तांडेकर यांचे मार्गदर्शनात सदर स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात 14 वर्षाखालील गटात कु. सोमांशी साखरे, खुशी सारंगपुरे, श्रुती सारंगपुरे, अंगद भालाधरे, यांनी सुवर्णपदक मिळविले तर कु. आयुषी बन्सोड हिला रजत पदक मिळाले आहे. तर 17 वर्षाखालील गटात रत्नदीप माने व कु. सिमरन फुले यांना सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच क्रिस मेश्राम, मोहित खरोले व अयांशू कांबळे यांना सहभाग प्रमाणपत्र मिळाले. सर्व विजेत्या स्पर्धकांचे व सर्व प्रशिक्षकांचे जिल्हा तायकांडो असोसिएशनचे अध्यक्ष दुलीचंद मेश्राम व सर्व पालकांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles