Home नागपूर सरस्वती नगरात वडाच्या झाडाला सौभाग्यवतीचा धागा बांधून व्रत वटपौर्णिमा साजरी

सरस्वती नगरात वडाच्या झाडाला सौभाग्यवतीचा धागा बांधून व्रत वटपौर्णिमा साजरी

34

सरस्वती नगरात वडाच्या झाडाला सौभाग्यवतीचा धागा बांधून व्रत वटपौर्णिमा साजरी



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: शहरातील सरस्वती नगर येथे वटपौर्णिमेच्या दिवशी परिसरातील महिलांनी वडाच्या झाडाला धागा बांधून पटपोर्णिमा साजरी केली. यावेळी सौ. प्रतिभा देवराव प्रधान, सौ. मेघा प्रदीप गणोरकर, सौ. प्रीती अविनाश गणोरकर आणि त्यांच्या सासूबाई श्रीमती गणोरकर ह्या देखील पूजेसाठी उपस्थित होत्या.

भारत देश हा कृषिप्रधान देश असून भारतीय संस्कृती मराठी आहे. हिंदू धर्मात भारतीय महिला ज्येष्ठ महिन्यातील पूर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला धागा बांधून ७ फेरे घेऊन आपल्या परमेश्वर पतीने जास्त आयुष्य जगावे. या करिता पुजा करतात.

तसेचदिवसभर उपवास ठेवतात. त्याला वटसावित्री व्रत म्हणतात. यंदा हा सण 14 जून रोजी आलेला आहे. पौर्णिमेचा दिवस महत्त्वाचा आहे. ज्येष्ठ महिन्यात शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा पाती करून हा दिवस पाळतात. आणि ह्या सर्व सौभाग्यवती सुवासिनी आपल्या घरूनच आरती साजरी करून वडाच्या झाडाची पूजा करायला जातात त्या वेळेस आरती मध्ये चेने, गुळ, फळांचा नैवद्य सह आरती सजून नेतात आणि पूजा करतात. वडाच्या झाडाला सात प्रदर्शना मारून आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यातील प्रार्थना करत सुवासिनी आयुष्य मागतात.