यवतमाळच्या डीपीएम, डीएचओंनी कागदपत्रांची शहानिशा न करता कल्याण चव्हाणला दिली नियुक्ती

यवतमाळच्या डीपीएम, डीएचओंनी कागदपत्रांची शहानिशा न करता कल्याण चव्हाणला दिली नियुक्तीपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_उच्च स्तरीय चौकशी करून डीपीएम/डीएचओ यांना निलंबित करण्याची मागणी_

यवतमाळ :- जिल्हा आरोग्य कार्यालयांमध्ये “एन.एच.एम.” अंतर्गत सायकॉलॉजिस्ट या पदावर परभणी जिल्ह्यातील कल्याण प्रभाकरराव चव्हाण नामक व्यक्तीने खोटे जात प्रमाणपत्र सादर करून नियुक्ती मिळविल्याची बातमी पुढे आली आहे. सदर व्यक्तीने (एससी) व (व्हीजेएनटी) या दोन वेगवेगळ्या जातीचे प्रमाणपत्र सादर करून नोकरी लाटल्याचा गंभीर प्रकार माहिती अधिकार अंतर्गत उघडकीस आला आहे. महत्वाची बाब म्हणजे डीपीएम, डीएचओंनी सायकोलाॅजिस्ट पदासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्राची शहानिशा न करता चव्हाण यांना नियुक्ती दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नागपूर जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश भालेराव यांनी दि. 23 मे 2022 रोजी यवतमाळ जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करून संबंधित व्यक्तीच्या कागदपत्राची पडताळणी करून त्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. तर डीपीएम/डीएचओ एका महिन्यात चव्हाण यांचे राजीनामा घेऊन भरती प्रक्रियेला कलंकित केले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश भालेराव यांनी माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत मागितलेल्या माहितीनुसार कल्याण चव्हाण यांच्या सर्व कागदपत्रांची तपासणी केली असता त्यांच्या नावाने दोन प्रकारच्या जात प्रमाणपत्र (एससी/व्हीजेएनटी “ए”) व तसेच ट्रिपल एन्रोलमेंट नंबर मार्कशीटवर आढळून आलेले आहेत. यांच्या मार्कशीट, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र सुद्धा खोटे आहेत असे सबळ पुराव्यानिशी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांनी चौकशी करिता अर्ज सादर केला होता, विद्यापीठाने नोंदणीकृत टपालाने स्पष्ट केले की प्रणाणपत्र आमच्या विद्यापीठाचे नाही, आणि उलट माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश भालेराव यांना अस्सल प्रमाणपत्राची एक प्रत आम्हाला पुरवावी. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे प्रमुखांच्या या हा भोंगळ कारभार दिसून येत आहे.

दि. 26/05/2022 ला नोंदणीकृत टपालाने जबाब सतीश भालेराव यांना आला आहे. त्यात अमरावती विद्यापीठाने लिहिले आहे की कल्याण प्रभाकरराव चव्हाण यांची प्रमाणपत्र आमच्या विद्यापीठाची नाहीत असे स्पष्ट लिहिले आहे. व तसेच भालेराव यांनी नागपूर पोलीस आयुक्तांना (झिरो एफ.आर.आय.) नोंद करण्याकरिता अर्ज दिला होता, त्यावर चौकशी सुरू असून, तसेच कल्याण चव्हाण याने यवतमाळ येथे कार्यालयांमध्ये “एन.एच.एम.” अंतर्गत सायकॉलॉजिस्ट या पदावर रुजू झाला असून याची प्रशासकीय चौकशी करून यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी सतीश भालेराव यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार डीपीएम प्रिती दुधे यांच्या बेजबाबदारपणामुळे यवतमाळ भरती प्रक्रिया लांबणीवर गेली. डीपीएम यांनी कल्याण चव्हाण यांचे प्रमाणपत्र व्हेरिफिकेशन अमरावती विद्यापीठात परिक्षा विभागाला पाठवून व्हेरिफिकेशन केलेच नाही अशी माहिती समाज माध्यमांच्या प्रतिनिधींना दिली आहे. सात ते आठ महिन्यांनंतर खूप उशीरा चव्हाण यांनी नियुक्ती में महिन्यात करण्यात आली व जून महिन्यात राजीनामा घेण्यात आला.

यवतमाळ भरती प्रक्रियेत चव्हाणला फेव्हर केल्याची समाज माध्यमातून चर्चा होत आहे. अशा या बेजबाबदार डीपीएम डीएचओंविरुद्ध नागपूरच्या माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश भालेराव यांनी दि. ०७/०६/२०२२ ला आनलाईन पद्धतीने ईमेल व्दारे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हाधिकारी यवतमाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ, पोलीस अधिक्षक यवतमाळ येथे ऑनलाईन तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे, व तात्काळ प्रशासकीय उच्च स्तरीय चौकशी करून डीपीएमला/डीएचओ यांना निलंबित करण्याची फौजदारी गुन्हे दाखल करुन कारवाईची मागणी केली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles