
सांगलीत एकाच कुटुंबातील ९ जणांनी आत्महत्या करून संपवली जीवनयात्रा
सांगली: एखाद्या व्यक्तीला अनेक कारणांनी आपले जीवन संपवावे असे वाटू शकते. मात्र एकाचवेळी कूटूंबातील सर्वांना एकाच वेळी आपले जीवन संपवावे असे वाटणे अथवा घडणे शक्य नाही. असे वाटत असले तरी आज अशी एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेतीस सर्वांनी आत्महत्या का केली ? याबाबत अद्याप ठोस माहिती मिळाली नसली तरी या आत्महत्या आर्थिक कारणावरून केल्या असाव्या असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे घडली आहे. या घटनेत म्हैसाळ येथील एकाच कुटुंबातील 9 जणांची आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्येतील मयतांमध्ये डॉ. माणिक येलाप्पा वनमोरे, आक्काताई वनमोरे (आई), रेखा मानिक वनोरे (बायको), प्रतिमा वनमोरे (मुलगी), आदित्य वनमोरे (मुलगा), पोपट येलाप्पा वनमोरे (शिक्षक), अर्चना वनमोरे (पत्नी), संगीता वनमोरे (मुलगी), शुभम वनमोरे (मुलगा) आदींचा समावेश आहे.