‘आपण आनंदाचे पाईक कधी होणार’?

‘आपण आनंदाचे पाईक कधी होणार’?पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सविता पाटील ठाकरे, सिलवासा

📘आजच्या जागतिकीकरणाच्या युगात समाज अतिशय प्रगत झाला आहे. मात्र त्याबरोबरच प्रचंड स्पर्धाही निर्माण झाली आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी, पैसा मिळविण्यासाठी माणूस जीवाचा आटापिटा करतोय. या गळेकापू स्पर्धेत टिकाव धरून ठेवतांना माणूस अधिकच चिंताग्रस्त होत चाललाय. आहे त्यात समाधान न मानता प्रत्येक कृतीत फायदा काय आहे? याचा विचार करू लागलाय. मला कालच एकाने प्रश्न केला..”मॕडम..तुम्ही एवढे सुंदर लेख लिहितात. भाषेसाठी काम करतात..तुम्हांला काही फायदा होतो का?”.. खरं तर मला हसूही आले व दयाही…प्रत्येक कृती आपण फायद्यासाठीच करायची का?..आपण करत असलेल्या कामातून आपल्याला निर्भेळ आनंद मिळतो…या मिळणाऱ्या आनंदाचे मोल काय?…प्रत्येक गोष्ट लोक पैशातच का बरं तोलत असतील?….मला प्रश्न विचारणाऱ्या असल्या लोकांची कीव कराविशी वाटते…यांना कुडाच्या घरात राहून दिवसभर काबाडकष्ट करणाऱ्या आमच्या शेतीमातीतील बांधवांना भेटायला घेऊन जावेसे वाटते मला,… अहो, फुलांच्या बागेत रमणे तर सा-यांनाच आवडते..पण खडतर वाटचालीच्या रस्त्यात काटे वेचीत चालणारे सिकंदर जगण्यातली खरी मौज अनुभवीत असतात…स्वतःपुरतं जगणारे हे!..यांना काय कळणार?

✍️याउलट मला अशा लोकांनाच प्रश्न विचारावासा वाटतो..पैसा आनंद विकत घेऊ शकतो काय?…आनंदाच्या विमानात बसून आपण वाटेल त्या प्रदेशात जाऊ शकतो,विविध स्वभावाच्या माणसांशी समरस होतो आणि नकळत स्वतःच्या संकुचित व्यक्तीमत्वाचा विकास करीत असतो. आत्मविश्वास प्राप्त अनेक साहित्यिक, कवी कवयित्री इतरत्र लिखाण करतांना दिसतात कौतुकास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. परंतु आपण जिथून हा आत्मविश्वास निर्माण करू शकलो, त्या प्रेरणादायी स्त्रोताला विसरता कामा नये…! खरे तर आपण इतरांच्या आनंदाचे पाईक व्हायला हवे, पण आपण आपली पोळी भाजून घेण्यात धन्यता मानतो… असो.

🚩मराठीचे शिलेदार समूहात सर्व स्पर्धेत निस्वार्थपणे आपल्या सर्वांना भरभरून आनंद देणाऱ्या ..आदरणीय राहुल सरांनी मध्यंतरी ‘आनंदाचे मोल’ हा विषय देऊन जणू आपल्या सर्वांना आनंदाच्या विमानात बसून सर्वत्र विरहायलाच पाठवले…परिक्षणार्थ रचना वाचत असतांना…शब्दप्रभू कवी कवयित्रींनी वर्णिलेले आनंदाचे मोल खरोखरच वंदनीय वाटले. कुणी नकारात्मक वृत्तीला झुगारून मुखकमलावर स्मीत आणणारे क्षण विशद केलेत तर.,. कुणी कोत्या मनोवृत्तीच्या लोकांना आनंदाचे मोल काय कळणार अशी सणसणीत चपराक दिलीय….मधुर वाणी…मातृसुखाचा आनंद…वृध्दावस्थेतील अवहेलना….विरह…आनंदाचा बाजार असे वेगवेगळे विषय हाताळून काहींनी भरभरून आनंद देणाऱ्या निसर्गाची जपणूक करण्याचा संदेश दिलाय…आनंदाच्या मोलास मोजमापच नाही…बाबा आमटेंनी कुष्ठरोग्यांच्या चेहऱ्यावर फुलवलेला आनंद…शब्दसारथीने मिळणारा आनंद..यापलिकडे जाऊन आमचे कवीवर्य समाधानालाच आनंदाची गुरूकिल्ली मानून अनमोल आनंद लुटायला सांगतात….तुम्हां सर्व कवी कवयित्रींच्या लेखणीस मनापासून सलाम व अभिनंदनही…!

✍️पण थोडे काही…कविता लिहितांना कवितेत शब्दांचा भाव रिचवावा. त्यातील व्याकुळता जाणून घ्यावी..मनाला भिडणारे..समृद्ध करणारे सौंदर्यदृष्टी, सहृदयता, यांनी युक्त असे लिखान करावे. विषयाला न्याय देतांना कवितेच्या सर्वांगाना शब्दरूपी काव्यस्पर्श व्हावा या हेतूने काव्यलेखन होणे गरजेचे आहे. लेखणी प्रगल्भ होण्यासाठी सर्वांनी आपला शब्दभांडार वाढवावा जेणेकरून वाचन संस्कृती वाढीस लागेल. आपण सर्व मराठी भाषेचे सक्षमीकरण व संर्क्षण, संवर्धन करण्यास कटीबद्ध आहोतच. पुढील स्पर्धेसाठी सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा…!!!

सविता पाटील ठाकरे,सिलवासा
मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री/समीक्षक/मुख्य सहसंपादक
©मराठीचे शिलेदार समूह

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles