‘साहित्यगंध’ एक ऊर्जादायी प्रेरणास्त्रोत

‘साहित्यगंध’ एक ऊर्जादायी प्रेरणास्त्रोत



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

वसुधा नाईक, पुणे

मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक व साहित्यगंधचे संपादक मा.राहुल सर ,पल्लवी ताई, सवूताई, वैशूताई, सर्व सहप्रशासक ‘साहित्यगंध’ अंक क्र ४६ नेहमीप्रमाणेच बहारदार आहे.पण या वेळी पृष्ठ संख्या कमी दिसतेय. शिलेदारांना सांगू इच्छिते की राहुल सरांच्या मार्गदर्शनाखाली,रोजचे नवे विषय ,यातून मी शिकत आहे. खरे तर साहित्यगंध हा ऊर्जादायी प्रेरणास्त्रोत आहे असे मी आवर्जून नमूद करू इच्छिते.

पाच वर्षात नक्कीच मला समाजात कवयित्रीचा सन्मान मिळाला. हा सन्मान आपल्या समूहामुळे मिळालाय. चारोळी पासून सुरूवात करत आज मी लेख, कथा, बालगीते, बडबड गीते, हायकू, चित्रचारोळी असे विविध विषय हाताळते. पूर्वी वहीवर रफ करायची ,खाडाखोड असायची, शब्द हा नको तो घेवू असे करत दिवसभरात एकच कविता व्हायची.

समूहात रात्रीचे नऊ वाजण्याची वाट पाहायची. कारण विषय येतो ना. विषय पाहिला लेखणी सरसर चालायची. विचारांना गती मिळायची. कित्येक वेळा सर मला म्हणायचे “ताई झोपा. उद्या लिहा.” कारण मी online ते पण online समूहाच्या कामात व्यस्त असायचे. सांगण्याचा उद्देश एवढाच की लिहा, लिहा, लिहा ..थांबू नका ..!!

आता मला चटकन शब्द सुचतात. कविता कागदाऐवजी डायरेक्ट समूहावर करते. अजूनही खूप शिकायचेय.. जेवढे ज्ञान घेता येईल तेवढे घेतच राहणार. आपणही सरांनी चालू केलेल्या या साहित्यगंधमध्ये सहभागी होवून पुढचा अंक आपण बारा पानी करू या..!!

माझा लेख “आईलाही मन असते” हा मी लिहिला; म्हणजे त्या दिवशी मी वैभवला घेवून दवाखान्यात गेले हे लेकीला, लेकाला सांगितले नाही. कशाला सांगाव्यात छोट्या गोष्टी. म्हणून नाही सांगितली पण…मी मुलांची बोलणी प्रेमळ खाल्ली. जरा मुलीचा आवाजही चढला माझाही चढला.. हे सर्व प्रेम बोलतेय हे समजत होते पण आश्रूही येत होते. त्यातच मला हा विषय सुचला व ताबडतोब मन रिकामे केले. लेख लिहिला.सरांना पाठवला .सरांकडून ‘ सुंदर मांडणी’ हा संकेत मिळाला, मला शांत म्हणता येणार नाही पण झोप लागली.

अशी जादू आहे लेखनात.तर शिलेदार मित्रांनो लेखन करा..मन मोकळे करा.. मी कोणी मोठी नाही पण जे समजते तेच लिहिते. सर्व वाचकांचे मनापासून धन्यवाद!
धन्यवाद!!
धन्यवाद!!

वसुधा नाईक, पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles