
आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह झिंगाबाई टाकळी येथे सिकलसेल तपासणी शिबीर
सतीश भालेराव, नागपूर
नागपूर: – आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे, आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र शासन यांचे द्वारा महाराष्ट्रातील आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आश्रमशाळा व वसतिगृहे यामधील सर्व विद्यार्थ्यांचे सिकलसेल ॲनिमियाच्या स्थितीचे सर्वेक्षण करणे आणि आदिवासी विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करून कार्ड वाटप करण्याबाबतची योजना संदर्भात आज आकार बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था नागपूर द्वारा आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह झिंगाबाई टाकळी येथे सिकलसेल तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.
शिबिरात एकूण 70 मुलींची सिकलसेल सोलुबिलीटी तपासणी केली यामध्ये 10 मुली सिकलसेल सोलुबिलीटी पॉझिटिव्ह आढळल्या
या शिबिरात सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे यांनी सिकलसेल आजाराबाबत मार्गदर्शन केले. शासनाच्या या योजनेद्वारा नागपूर व नाशिक विभागाअंतर्गत सुमारे पावणे दोन लाख विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात येणार असून सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे रोगनीदान झाल्यावर कार्ड वाटप करण्यात येतील. शिबिर यशस्वीकरीता सिकलसेल कोऑर्डीनेटर विशाल बांदरे, पायल देवगडे, समिक्षा कोडापे, तेजस्विनी आत्राम, दिक्षा पाटील वसतिगृहातील गृहपाल एस डी धडांगे व वसतिगृहातील मुलींनी सहकार्य केले.