शिंदेंचीच खरी शिवसेना; आठवले

शिंदेंचीच खरी शिवसेना; आठवले



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सांगली: एकनाथ शिंदे यांचे महाबंड असून त्यांचाच गट खरी शिवसेना आहे असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. सामुहिक आत्महत्या झालेल्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी म्हैसाळला भेट दिल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, महाविकास आघाडी अनैसर्गिक होती, बंडाळीमुळे सेनेतील असंतोष बाहेर पडला आहे. महाविकास आघाडीचा विकासाचा अजेंडा नव्हता. त्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीसहून अधिक आमदार बंडामध्ये सहभागी झाले.

राज्यसभा, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तोंड काळे झाले आहे. सेनेच्या बहुसंख्य आमदारांचे मत भाजपसोबत युती करण्याचे होते. मात्र संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांची दिशाभूल केली. यापूर्वी भुजबळ, राणे, राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळेपेक्षा आताची स्थिती वेगळी असून हे महाबंड आहे. शिंदे यांचा गटच खरी शिवसेना मानतो. भाजपने आता सरकार स्थापन्यासाठी पुढाकार घ्यावा. रिपाईला सत्तेत वाटा मिळायला हवा असेही ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles