
नारायण बागडे यांना मातृशोक
नागपूर – आम्बेडकरी विचार मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे याच्या आई सुमनताई तुकाराम बागडे याचे आज रात्री 9.30 वाजता निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर उद्या दुपारी 2.00 वाजता अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार होईल. त्याच्यामागे मोठा आप्तपरिवार आहे. सुमनताई या आम्बेडकरी चळवळीत अनेक वर्षांपासून सक्रिय सहभागी होत्या. त्यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आम्बेडकरी चळवळीतील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला.