रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाची नारे निदर्शने

रिपब्लिकन आघाडी लोकशाही मोर्चाची नारे निदर्शनेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: नागपूर मनपा अंतर्गत साप्ताहिक बाजार व फुटपाथ दुकानदारांचा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत पडला आहे. भारतीय घटनेनुसार प्रत्येक व्यक्तीला भारतात कुठेही रोजगार किंवा धंदा करण्याचा अधिकार आहे. अनेक बेरोजगारांजवळ डिग्री, डिप्लोमा, व आरक्षणाची संधी असून सुध्दा आजपर्यंतच्या सर्व केंद्र व राज्य सरकारचे नीती आणि धोरणामुळे अनेक बेरोजगारांना नौकरी किंवा योग्य स्थायी रोजगार मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव तुटपुंज्या पुंजीमुळे शहरातील फुटपाथवर दुकान लाऊन स्वतःची व परिवाराच्या पोटाची भूक कशीतरी भागवावी लागत आहे.

यावर तोडगा काढण्याच्या हेतूने सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश्यानुसार संसदे मध्ये फुटपाथ दुकानदारांच्या संरक्षणार्थ 2014 ला अधिनियम व 2017 ला नियम बनविण्यात आले. त्यानुसार जोपर्यंत पर्यायी व्यवस्था होऊ शकत नाही तोपर्यंत फुटपाथ दुकानदारांना हटवायचे नाही. परंतु काही मुठभर लोकांना वाहतुकीचा, चालण्याचा त्रास होण्याचा बहाणा करून निर्दयी प्रशासन फुटपाथ दुकानदारांना अधूनमधून हटविण्याचे काम करीत असते.

नागपूर मनपा अंतर्गत 50 हजारांच्यावर साप्ताहिक बाजार व फुटपाथ दुकानदार आहे. परंतु नागपूर मनपाने पंतप्रधान स्वनिधी कर्ज योजने अंतर्गत 38, 817 दुकानदारांनी कर्जासाठी अर्ज केले असताना फक्त 20,406 लोकांना कर्ज देण्यात आले. त्यानंतर कर्ज देणे बंद केले. 3 वर्षा पुर्वी नागपूर मनपाने हजारो रुपये खर्च करून 2014 च्या कायद्यानुसार शहर समितीची (टाऊन कमेटी) निवडणूक घेऊन 8 सदस्य दुकानदारांनी निवडून दिले होते त्यातील 1 सदस्याचा मृत्यु झाला तरीपण अजूनपर्यंत 20 सदस्य समिती गठीत करून कार्य सुरु केलेले नाही. त्यामुळे फुटपाथ व साप्ताहिक दुकानदारामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यांची मागणी आहे कि मनपाने 50 हजारांच्यावर सदस्यांची पुन्हा नोंदणी करून निवडणूक घ्यावी. जेणेकरून सर्वाना प्रतिनिधित्व मिळावे.

नागपूर मनपाने हॉकर्स झोनचा पाठिलेला प्रस्तावावर राज्य सरकारने त्वरित निर्णय घेवून साप्ताहिक बाजार व फुटपाथ दुकानदारांना हॉकर्स झोन मध्ये सामाविष्ठ करून घ्यावे. सर्वांची पुन्हा नोंदणी करावी या मागणीचे निवेदन राधाकृष्ण निगमायुक्त मनपा नागपूर यांना दिले असता त्यांनी सांगितले की जोपर्यंत सरकारचं समिती गठीत करण्यासाठी नोटीफिकेशन येत नाही तोपर्यंत सुरक्षा करने कठिण आहे. किंवा कोर्टाने निर्णय द्यावा. राज्य सरकारने व मनपा ने रिक्त पदांसाची भरती, सेनेतील अग्नीपथ भरती रद्द करावी या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले

यावेळी कॉ. माधव भोंडे, एड.रमेश किचारे, रमेश शर्मा, हेमंत पाटमासे, कॉ. अरुण लाटकर, दिलीप देशपांडे, राजेंद्र साठे, विलास जांभुळकर, रामेश्वर चरपे, घनश्याम फुसे, विश्वनाथ ताकसांडे, यशवंत तेलंग, साप्ताहिक बाजार व फुटपाथ दुकानदार संघटनेचे हेमंत पाटमासे, महेश सुमाटे, सुरेश गौर, नियाज पठान, संजय वर्मा, जगदीश गावंडे, आशिष शाहू, अमन, राहुल कुहिटे, प्रफुल्ल मेश्राम, अभिलाष जांभुळकर, शेखर वर्मा, आदी भारी संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles