
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षांचा संवाद दौरा
नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राजसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने राज्य प्रमुख संघटक चेतन पेडणेकर आणि संघटक संतोष गांगुर्डे, यांच्या नेतृत्वाखाली रविभवन येथे बैठकीत उपस्थिती राहणार आहे. आणि विदर्भातील सर्व आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या भेटीकरिता २३ जून रोजी, नागपुरात रवीभवन येथे सकाळीच शासकीय विश्राम गृहात 10 वाजता पासून बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी व आगामी महानगर पालिका निवडणुकीसाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकार्यांचा संवाद दौरा मा. राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरेंचा विदर्भातील आगमन होताच पक्षामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमित साहेबांचे हात बळकट करण्यासाठी राजसाहेब ठाकरे यांचे विचार सर्वदूर पसरविण्यासाठी संघटनेची बांधणी करायची आहे. त्याकरिता विदर्भातील नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशीम, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यातील मनसे विद्यार्थी सेनेच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी व ज्यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत नव्याने काम करायचंय त्यांनी चेतन पेडणेकर प्रमुख संघटक आणि संतोष गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधावा. असे दिनेश इलमे नागपुर जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेना यांनी कळविले आहे.