१२८ वा ऑलिम्पिक डे साजरा; दादाजी कोंडदेव, द्रोणाचार्य पुरस्काराने खेळाडूंचा सत्कार

१२८ वा ऑलिम्पिक डे साजरा; दादाजी कोंडदेव, द्रोणाचार्य पुरस्काराने खेळाडूंचा सत्कारपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सतीश भालेराव, नागपूर

नागपूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, ऑलिंम्पिक असोसिएशन अंतर्गत महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन व एकविध खेळ संघटना, जिल्हा क्रीडा आस्थापना यांचे संयुक्त विद्यमाने आज दि.२३ जून २०२२ रोजी सकाळी ९.३० वाजता आनंद नगर व्हॉलीबॉल असोसिएशनच्या भव्य मैदानावर विजय डांगरे, कार्यकारी उपाध्यक्ष, भारतीय व्हॉलीबॉल महासंघ, अध्यक्ष, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे अध्यक्षतेखाली सोहळ्याला सुरवात झाली. नियोजनाप्रमाणे अध्यक्ष व मुख्य अतिथी यांनी हिरवी झेंडी उंचावून खेळाडू व विद्यार्थी यांचे रॅलीला सुरवात केली. यात आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू, मान्यवर आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मोठया संख्येने सहभागी झाले होते.

*प्रमुख अतिथी*
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शेखर पाटील उपसंचालक, क्रीडा व युवा विभाग,नागपूर, डॉ. जयप्रकाश दुबळे, सहसंचालक, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक,दादाजी कोंडदेव अवार्डी विजयजी मुनींश्वर, भाजपा नगरसेविका दिव्याताई धुरडे, शोएब सर, दीपक कानेटकर, मनपाचे क्रीडा अधिकारी अंबुलकर उपस्थित होते.
मंचावर उपस्थित अध्यक्ष, व प्रमुख पाहुण्यांचा यथोचित सत्कार आटोपल्यावर जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी प्रास्ताविकमध्ये ऑलिंम्पिक दिवसाचे महत्त्व व उद्देश याची सविस्तर माहिती दिली.
क्रीडा उपसंचालक शेखर पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व खेळाडूंना ऑलिंम्पिकमध्ये खेळण्यासाठी ग्रामीण स्तरापासून शहरी राज्य व राष्ट्रीय पातळीवर “शासन आपल्या दारी’ या ब्रीद वाक्यप्रमाने कशी मदत मिळेल याबाबत माहिती दिली. दादाजी कोंडदेव अवार्डी विजय मुनींश्वर यांनी ऑलिंम्पिकची स्थापना यावर संपूर्ण माहिती विशद केले. तर अध्यक्षीय भाषणात विजय डांगरे यांनी नागपुरातील सर्व खेळाडूंनी त्यांच्या खेळाचा स्तर उंचावन्यासाठी प्रत्येक खेळाची क्रीडा अकेडमीची शहराला नितांत गरज आहे असे संबोधले.

*खेळाडूंचा सत्कार*

१) दादाजी कोंडदेव,द्रोणाचार्य, अर्जुन, शिवछत्रपती अवार्डी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ९ पदके देशाला जिंकवून देणारा,११५ वेळा रक्तदान करणारे विजय मुनींश्वर यांचा भव्यदिव्य सत्कार करण्यात आला.
२) आंतरराष्ट्रीय अंध क्रिकेट खेळाडू, अक्षय बोरीकर,
३)आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू गुरुदास राऊत
४) सॉफ्टबॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू पियुष अंबुलकर,
५)योगा मध्ये आंतराष्ट्रीय स्तरावर एकूण २१ पदके देशासाठी जिंकून देणारी कु. धनश्री लेकुरवाळे
६) अवघ्या १३ वर्षांपासून खेळाला सुरवात करणारी आज २० वर्षाची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटपटू एकूण सहा वेळा देशाचे प्रतिनिधित्व करणारी कु. रीतीका ठक्कर
७) १२ वी मध्ये असलेली कु. निकिता जोसेफ हिने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्तरावर देशाला सुवर्ण पदक मिळवून दिले.
८)कु.जेनिफर वर्गीस १२ वी हिने टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला सिल्व्हर पदक मिळवून दिले.
९) कु. जयश्री ठाकरे हिने साऊथ एशियन चॅम्पियन स्तरावर व्हॉलीबॉल खेळामध्ये सुवर्णपदक मिळवून दिले.
१०) अल्फीया पठाण आंतरराष्ट्रीय स्तरावर बॉक्सिंग मध्ये एकूण तीन सुवर्णपदक मिळवून दिली.
११) धनंजय उपासनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दिव्यांग क्रिकेटमध्ये प्रशिक्षक, स्पेशल ऑलिंम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता
१२) जयंत दुबळे याला आंतरराष्ट्रीय स्तरावर स्विमिंग साठी गौरविण्यात आले.
१३) कु. दीक्षा देवाडकर राष्ट्रीय खेळाडू ही “पीएसआय” साठी निवड झाल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा
अधिकारी मानकर मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थित सर्वांनी सहभोजन करावे अशी विनंती केली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे अधिकारी, एकविध क्रीडा संघटनेचे पदाधिकारी, तसेच जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनचे अरविंद गवई, सागर सगदेव, नितीन कानोडे, विलास गुंडाळे, प्रवीण चिलकूलवार, आकाश पाटील, भावेश, दीक्षा देवाडकर यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles