धक्कादायक…!! कोरोना काळात बालमजूरांच्या संख्येत वाढ

धक्कादायक…!! कोरोना काळात बालमजूरांच्या संख्येत वाढ



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_शिक्षणाच्या प्रवाहात बालकामगारांना कसे आणणार_

मुंबई : राज्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नसली तरी सर्वांना आरोग्य विभागाकडून उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. एकीकडे राज्यात ब़डखोरांनी सत्तेसाठी घमासान युद्ध सुरु केले आले. मागील दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. एकीकडे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे नोकर्‍या जात होत्या, तर दुसरीकडे बालकामगार वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मागील 2 वर्षांच्या काळात राज्याच्या ग्रामीण तसेच शहरी भागातील मुलांच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे.

यासारख्या अनेक कारणांमुळे राज्यातील बालकामगारांच्या संख्येमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाली. विशेष म्हणजे राज्याच्या जालना, नंदुरबार आणि परभणी या तीन जिल्ह्यांमध्ये अधिक बालकामगार असल्याची माहिती ‘क्राय’ या संस्थेनी आपल्या अहवालातून समोर आणली आहे.

लॉकडाऊनमुळे जालना, लातूर, वर्धा, अहमदनगर, नंदुरबार आणि परभणी या सहा ग्रामीण जिल्ह्यांतील बालमजुरीत असलेल्या तसेच, शेतीमध्ये काम करणार्‍या मुलांची संख्या वाढली असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दोन वर्षापासून या बालमजूरांनी शाळेचे तोंडही पाहिले नसल्याने शिक्षणापासून वंचित आहेत. यांच्या पोटापाण्याचा प्रश्न ऐरणीवर असून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसे आणणार हा सर्वात मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles