Home ताज्या घटना बंडखोर शिंदेच्या गटाचे नामकरण ‘शिवसेना बाळासाहेब’

बंडखोर शिंदेच्या गटाचे नामकरण ‘शिवसेना बाळासाहेब’

124

बंडखोर शिंदेच्या गटाचे नामकरण ‘शिवसेना बाळासाहेब’पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गुवाहाटी: नगर विकास मंत्री व शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं असून, शिंदे गटांनी गुवाहाटी येथे आयोजित बंडखोरांच्या बैठकीत नामकरण केल्याची माहिती प्राप्त होत आहे. ‘शिवसेना बाळासाहेब’ ठाकरे गट असे नाव ठेवले आहे. राज्यातील घडामोडीला आता अजून वेग येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

दरम्यान शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर आक्षेप घेण्याची शक्यता आहे. शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक देखील सुरू होत आहे. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या बाबत काय निर्णय होतो हे देखील पहावे लागेल. परंतु एकनाथ शिंदे यांनी आपल्या तब्बल 40 समर्थक आमदारांसह शिवसेनेतून बंड पुकारल्या नंतर आता एक मोठी घोषणा केली आहे. शिंदे गटाने आपलं नाव शिवसेना बाळासाहेब गट अस ठेवलं आहे. गुवाहाटी येथील बैठकीत हे नाव निश्चित झालं असून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कालच बंडखोर आमदारांना इशारा देत हिंमत असेल तर शिवसेना आणि ठाकरे नाव वगळून जगून दाखवा अस आव्हान दिले होते. त्यानंतरही आज शिंदे गटाने आपल्या गटाला बाळासाहेबांचे नाव दिले आहे.