भाजपाचा नवा डाव, राज्यात दोन दिवसांत होणार विधानसभा अध्यक्षांची निवड

भाजपाचा नवा डाव, राज्यात दोन दिवसांत होणार विधानसभा अध्यक्षांची निवड



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: भाजपा आता एक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत असून, दोन दिवसापूर्वी झालेल्या अमित शहा, फडणवीस व एकनाथ शिंदे यांच्या गुप्तभेटीतील रहस्य उलगडणार असल्याचे चित्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चीले जात आहे. महाराष्ट्रात दोन दिवसात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नियुक्तीची मंजुरी देण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन सुप्रीम कोर्टातील याचिका मागे घेणार असल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्षपदाबाबत त्यांनी दाखल केलेली याचिका मागे घेणार सूत्रांची माहिती असल्याचे सांगण्यात येते आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार महाराष्ट्रात परतण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

दरम्यान काल खासदार शिवसेना नेते संजय राऊत यांनी अक्षरश: बोचरी टीका केली, ते म्हणाले ‘गुवाहाटीतून ४० प्रेतं येणार आहे’, या वक्तव्याबद्दल त्यांच्या निषेधार्थ ठाण्यात त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आहे. त्यांचे विखारी विधान हे शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या जिव्हारी लागल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles