‘सायबर गुन्हेगारीला आळा कसा घालणार’? गृहमंत्री

‘सायबर गुन्हेगारीला आळा कसा घालणार’? गृहमंत्री



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_सर्वंकष धोरण तयार करण्याची गरज_

मुंबई: राज्यातील प्रत्येक मोठ्या शहरासह, ग्रामीण भागात अथवा गावखेड्यातही चोरट्यांनी नवीन शक्कल लढवत अनेकांची आर्थिक फसवणूक करीत असल्याचे अनेकदा तपासात उघड झाले आहे. सायबर गुन्हे, आर्थिक गुन्हे, सोशल मीडिया आणि ऑनलाईन गुन्हेगारीच्या माध्यमातून नागरिकांना लुटण्यात येत आहे. या सायबर गुन्हेगारीला आळा कसा घालणार? यावर विचार विमर्श करून योग्य तो पर्याय काढणे पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालून पोलिसांचं कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बुधवारी दिले. ते सायबर क्राईम विभागाचा आढावा बैठकीत बोलत होते.

राज्यातील वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि महाराष्ट्र राज्य सायबर सुरक्षा विभागाचा गृहमंत्री पाटील यांनी बुधवारी आढावा घेतला. राज्याचे अपर मुख्य सचिव आनंद लिमये, पोलीस महासंचालक रजनीश शेठ, प्रधान सचिव (सुरक्षा ) संजय सक्सेना, अपर पोलीस महासंचालक सायबर व आर्थिक गुन्हे मधुकर पांडे, अपर पोलीस महासंचालक नियोजन व समन्वय संजय वर्मा, विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव, पोलीस सहआयुक्त प्रवीण पडवळ यांच्यासह गृह विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

*राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती*

सायबर गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी राज्यात सायबर पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून प्रभावीपणे सायबर कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबरच दोषसिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागाच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा, सायबर गुन्ह्यांची उकल लवकरात लवकर करता यावी, आरोपी विरोधातील भक्कम पुरावे गोळा करता यावेत, तसेच भविष्यात या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजता यावेत यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याच्या सूचनाही गृहमंत्री वळसे-पाटील यांनी दिल्या. तसेच सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी राज्यातील पोलीस दलाला व्यापक यंत्र सामग्री देण्यात आलेली आहे. या उपलब्ध साधनसामुग्रीचा परिपूर्ण वापर करावा. तसेच या विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही वळसे पाटील यांनी दिले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles