
आशिया कपमध्ये भारतीय हॉकी संघाने कोरल कांस्य पदकावर नाव
भारताने पुन्हा एकदा जपानचा 1-0 असा पराभव करत आशिया कपमध्ये कांस्य पदकावर नाव कोरल आहे. मंगळवारी भारताने दक्षिण कोरियाविरोधातील सामना 4-4 असा बरोबरीत सोडला होता. त्यामुळे फायनलमधील आव्हान संपुष्टात आले होते.
त्यामुळे आज भारत जपानविरोधात कांस्य पदकासाठी मैदानात उतरला होता. जपानविरोधात आज बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने 1-0 च्या फरकाने मात मारत कांस्य पदकावर नाव कोरलेय. दोन्ही संघामध्ये साखळीमध्ये पहिला सामना झाला होता. तेव्हा भारतीय संघाला 2-5 च्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता.
त्यानंतर सुपर 4 मध्ये भारतीय संघाने 2-1 ने विजय मिळवत पराभवाचा वचपा काढला होता. दोन्ही संघात या स्पर्धेत तिसऱ्यांदा लढत झाली. यामध्ये भारतीय संघाने 1-0 च्या फरकाने विजय मिळवला. यासह या स्पर्धेत भारतीय संघाने कांस्य पदाकावर समाधान मानले.