संसदेत ३०० खासदार नाममात्र: डॉ.सुरेश माने

संसदेत ३०० खासदार नाममात्र: डॉ.सुरेश मानेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर : नागपुरात सिविल लाईन स्थित वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित पहिल्या संविधान परिषदेच्या दरम्यान अँड. डॉ. सुरेश माने म्हणाले की, लोकसभेत अनुसूचित जाती, जमातीचे १३१ खासदार व ओबीसी खासदार १६१ असूनही ते भांडवलदार मनुवादी राजकिय पक्षासी बंधीस्त असल्यामुळे बहुजन समाजातील खासदार समाजासाठी बिनकामाचे आहेत.

त्यामुळे बहुजन समाजाचे प्रश्न सुटत नाही म्हणून निवडणूक सुधारणा करून लोकसभसा-विधानसभेतील राखीव जागा धोरणांचा पुर्नविचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अॅड . डॉ.सुरेश माने, बी.आर.एस.पी. व्दारा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवी व राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षांतर्गत डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात संविधान परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

पुढे बोलतांना डॉ.सुरेश माने म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्ष झाली. परंतु या काळात या समाजाला काय मिळाले, त्यांच्या संविधानिक अधिकाराचे काय झाले, यावर देशभरात परिषद आयोजित केली जात आहे. त्यातून विदर्भस्तरीय पहिला परिषद नागपूर आयोजित केली आहे. त्यातून संशोधन प्रबंध तयार केला जाईल. तो विधी आयोग आणि निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे, असेही ते म्हणाले. पहिल्या सत्रात दै. देशोन्नती चे मुख्य संपादक प्रकाश पोहरे, अँड. भुपेन्द्र रायपुरे, यांची भाषणे झालीत. प्रकाश पोहरे आपल्या भाषणात म्हणाले की राखीव जागांचा पुनर्विचार करावा. निवडणूकीत भांडवलदार मनुवादी विचाराचे उमेदवार करोडो रूपये खर्च करतात म्हणून ते जनतेचे प्रश्न सोडवत नाही.

महाराष्ट्रात 5 आणि देशभरात 5 अशा 10 संविधान परिषद घेण्यात येतील. यावेळी अहवाल आणि संशोधनावर पेपर व इतर माध्यमातून तयार होणारा अहवाल निवडणूक आयोग व विधी आयोगाला सादर केल्या जाईल. अशी माहिती माने यांनी दिली. समाज बांधवांनी एकत्रित येणे आवश्यक आहे. आंबेडकरी पक्ष एकत्र येणे अवश्य आहे. या सर्व विरोधात एकत्र येऊन लढण्याची गरज आहे. जिल्हा पातळीवर आंबेडकरी जनतेला एकत्र आणून स्थानिक स्वराज्य संस्थेत समाजाची प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजेत. समाजाची बाजू मांडून आणि समाजाला त्याचे वैधानिक अधिकार मिळावे. यासाठी संविधान परिषदेचे आयोजन केल्या गेले होते.
कार्यक्रमांचे संचालन विदर्भ प्रदेश महासचिव रमेश पाटील यांनी केले.

संविधान परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये दिल्ली सरकार चे कॅबिनेट मंत्री राजेन्द्रपाल गौतम, हायकोर्टाचे जेष्ठ अधिवक्ता फिरदोस मिर्जा यांची भाषणे झालीत. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ.जे.बी.रामटेके यांनी केले. मंचावर विदर्भ प्रदेश अध्यक्ष विशेष फुटाणे, विदर्भ महासचिव भास्कर बांबोडे, संजय मगर, संजय बोधे, सी. टी. बोरकर, विदर्भ महिला आघाडी अध्यक्ष विश्रांती झांबरे, डॉ. पुनम घनमोडे, नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद रंगारी , नागपूर विद्यापीठ सिनेट सदस्य शिलवंत मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बी.आर.एस.पी.पक्षाचे प्रदेश सचिव सी.टी.बोरकर, पंजाबराव मेश्राम, एच.डी.डोंगरे, नागपूर नागपूर शहर अध्यक्ष मोरध्वज अढाऊ, महिला आघाडी अध्यक्षा वंदना लांजेवार, विधानसभा अध्यक्ष सी.डी.वाघमारे, दिलीप पाझारे, रवीन्द्र साठे , कमल किशोर तसेच प्रा.मंगला पाटील, मायाताई मेश्राम, शोभा तिरपुडे, यशोधरा नानवटे , लीनता लाले, यशोधरा नानवटे, विलास पारखंडे, बादल तेलंग , सुधा वासनिक, किशोर सोमकुवर, प्रविण खापर्डे, सौरभ गाणार, अशोक बागडे, देवानंद सोनडवले, एस.एस.मेश्राम, रेखा मेश्राम यांनी अथक परिश्रम घेतलेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles