टेकडी वाडी स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी न.प. विरोधात मनसेचे आंदोलन

टेकडी वाडी स्मशानभूमीच्या सौंदर्यीकरणासाठी न.प. विरोधात मनसेचे आंदोलनपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी, वाडी नागपूर, प्रतिनिधी

नागपूर: जिल्ह्यातील हिंगणा तालुका अंतर्गत येत असलेल्या टेकडी वाडी येथील स्माशनभूमीच्या सौंदर्यीकरणाची नितांत आवश्यकता आहे. जनप्रतिनिधीनी व नगरपरिषदने याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले आहे. मनसे वाडीने टेकडी वाडी स्मशानभूमीचे सौंदर्यकरण करण्यासाठी स्मशाभूमीमधे जाऊन नुकतेच आंदोलन केले व जनतेच्या मागण्यासाठी मनसेने आवाज उचलला आहे.

_’या’ आहेत मनसेच्या प्रमुख मागण्या_

टेकडी येथील स्मशानभूमीचे सौंदर्यीकरण करावे. येथे एक सुशोभित असे प्रवेशद्वार करावे. पथदिवे लावण्यात यावे. नवीन शौचालय बांधावे. सुरक्षा भिंतीस कुंपण करावे. शोकसंदेशच्या ठिकाणी पाणी टपकत असते स्लॅबचे नूतनीकरन करावे. मृत्यू नोंदणीसाठी न. प. वाडीतर्फे स्थायी स्वरूपात कर्मचारी नियुक्त करावा. अंतिमदाह साठी लागणारे लाकडे विनामूल्य मिळावे. मूबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. भगवान भोलेशंकर यांचे एक मदिर बांधावे. तसेच सी सी टिव्ही कॅमेरे लावावे. ह्या प्रमुख मागण्याठी मनसे वाडीने स्मशानस्थळी जाऊन आंदोलन केले.यापूर्वी न.प. वाडीला निवेदन दिले आहे.

टेकडी वाडी स्मशानभूमीची दयनीय अवस्था आजतागायत कुठेही बघितली नाही. कचऱ्याचे मोठ मोठे ढिगारे पडले आहे. मलब्याचे ढिगारे पडले आहे. प्रशासन सुस्त आहे की काय असेच वाटून राहिले. शौचालयाची अवस्था पण खूप बिकट आहे. आजूबाजूला जंगली झाडे वाढली आहे. बाजूला कंपाऊंड वालची गरज आहे. बसण्याच्या ठिकाणी स्लॅब मधून पाणी टपकत आहे स्लॅबचे प्लास्टर निघत आहे . मेन गेटची अत्यंत आवश्यकता आहे. पेंटिंग निघाली आहे पथदिवे लावावे जनतेला असुविधाचां भास होत आहे. आतमध्ये फुलांचे झाडे लावावे बऱ्याच वर्षापासून या विषयाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

मृत्यु नोंदणीची जागेवर व्यवस्था करावी. स्थायी स्वरूपात एक कर्मचारी नियुक्त करावा. जनतेचा त्रास वाचवावा, या भागातील लोक प्रतिनिधी व नगरपरिषदेने या विषयाकडे तात्काळ लक्ष केंद्रित करावे अशी आग्रहाची विनंती आंदोलनात केली आहे. मनसेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढे मनसे तर्फ तीव्र आंदोलन करण्यात येईल याची खबरदारी न.प. वाडी प्रशासनाने घ्यावी.

याप्रसंगी मनसेचे प्रदेश सरचटणीस हेमंत भाऊ गडकरी,जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे, तालुका संघटक दिपक ठाकरे, तालुका अध्यक्ष अनिल पारखी, संदीप माने, ओंकार तलमले, सूरज भलावी, मुकेश मुंडले, भरत डोंगरे, सूरज धारपुरे, आश्विन कोडापे, संतोष पाल, नितीन पिठोरे, विक्की वानखेडे, अजिंक्य वाघमारे, विठोबा घुरडे, योगेश सिरशवार, अनिकेत चवरे, धुर्गेश, राठोड, आकाश बाबर, बबलू सिंग, जयवर्धन शर्मा, महादेवजी सेडके, महेश मस्करे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles