Home गावगप्पा सामाजिक कार्यकर्ते अरविंद पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुडूत्री शाळेत साहित्य वाटप

सामाजिक कार्यकर्ते अरविंद पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुडूत्री शाळेत साहित्य वाटप

419

सामाजिक कार्यकर्ते अरविंद पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुडूत्री शाळेत साहित्य वाटपपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सुभाष चौगले, कुडूत्री(प्रतिनिधी)

कोल्हापूर: वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळत शाळेसाठी समाजासाठी, झटणारी तसेच मदतीसाठी पुढे येणारी माणसे आजही बदलत्या जमान्यात आहेत. असे मत कुडूत्री ता.राधानगरी येथे मुख्याध्यापक मधुकर मुसळे यांनी राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद पोवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय साहित्य वितरण प्रसंगी केले.

प्राथमिक शाळेत आज राधानगरी येथील सामाजिक कार्यकर्ते व उमेश भोजनालयाचे मालक अरविंद पोवार यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त १०५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. त्यामध्ये इयत्ता पहिली ते सातवी विद्यार्थ्यांचा समावेश होता. शाळेच्या वतीने अरविंद पोवार यांना शुभेच्छा देऊन सन्मान करण्यात आला.

आयोजित कार्यक्रमात मुख्याध्यापक मधुकर मुसळे, पीएन जाधव सर, सुभाष चौगले, उमेश पोवार, आदींनी आपली मनोगत व्यक्त केली. यावेळी मुख्याध्यापक मधुकर मुसळे , पी.एन.जाधव, लक्ष्मण गुरव, अनंतशांती राधानगरी भुदरगड अध्यक्ष सुभाष चौगले, कार्याध्यक्ष उमेश पोवार , शिक्षिका संगीता पाटील, अरविंद पोवार, ज्ञानेश्वर आंग्रे आदी. विद्यार्थी ,पालक,शिक्षक,ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रम प्रसंगी बोलतांना उमेश पोवार म्हणाले कुडूत्री या गावाशी आमचे ऋणानुबंध असून आपण या गावचे काहीतरी देणे लागतो या उद्देशातून वाढदिवसानिमित्त शालेय साहित्य प्राथमिक शाळेला देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मधुकर मुसळे यांनी तर आभार पी.एन जाधव सर यांनी मानले.