‘पॅराडाईज’चे दोन विद्यार्थी नवोदयसाठी पात्र

‘पॅराडाईज’चे दोन विद्यार्थी नवोदयसाठी पात्रपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_संस्थापक संतोष राऊत यांच्या हस्ते मुलांसह पालकांचा सत्कार_

गोंदिया: विदर्भातील काही अंशी भाग नक्षलग्रस्त म्हणून परिचित असलेल्या गोंदिया जिल्ह्यात शिक्षणाची गंगा प्रवाहाबरोबर वाहत असल्याने शिक्षणप्रेमीत उत्साहाचे वातावरण आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड या छोट्याशा गावी शिक्षणाची ज्योत ठेवत ठेवणा-या राऊत दांम्पत्याचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे. कोरोना कालावधीनंतर शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल करण्यात आले. यंदा जिल्ह्यात घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पूर्व परीक्षेत संतोष राऊत यांच्या ‘ इंग्लिश स्कूल’ सौंदड येथील कु. ऐश्वर्या सुधीर वाहाणे व कनिष्का ओमेश्वर मेश्राम हे दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयासाठी पात्र झाले आहे.

पॅराडाईज इंग्लिश स्कूल सौंदड येथील हे दोन विद्यार्थी नवोदय विद्यालय नवेगाव बांध येथील वर्ग 6 मध्ये प्रवेशास पात्र ठरले असून त्यांची गुणवत्तेच्या आधारे निवड करण्यात आली आहे. आज दि ९ जुलै २०२२ रोजी ‘पॅराडाईज इंग्लिश स्कूल तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला. संस्थापक संतोष राऊत यांनी बुके व पेढे भरवून विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पालकांचीही याप्रसंगी सत्कार करण्यात येऊन अभिनंदन करण्यात आले. आयोजित या सत्कार समारंभाला मुख्याध्यापिका राजश्री राऊत मॅडम व संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. विद्यार्थ्याने आपल्या यशाचे श्रेय विद्यालयाचे संस्थापक संतोष राऊत ,आई वडील, मार्गदर्शक शिक्षक यांना दिले. संस्थेच्या वतीने त्यांना पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles