
सफाई कामगारांचे आरोग्य शिबिर संपन्न
नागपूर: श्रमिक क्रांती बहुउद्देशीय संस्थेच्या च्यावतीने नुकत्याच झालेल्या हनुमान नगर झोन कार्यालयात आरोग्य शिबिर सफाई कामगारांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे मनपा हनुमान नगर झोन येथील आयुक्त हरीशजी राऊत, झोनल वैद्यकीय अधिकारी, श्रीमती बकुल पांडे. मुख्य स्वास्थ अधिकारी दिनकर कलोटे, डॉ. प्राजक्ता दमळु, तसेच मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सतीश होले यांची प्रमुख उपस्थिती होती.
सफाई कामगारांचे आरोग्य शिबिर घेण्यात आले असून त्यांनी सफाई कामगारांना मार्गदर्शन केलेत. या शिबिरात लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉ. खोब्रागडे (दंत चिकित्सक ) व परिचारिका नेहा, नीता वनवे, सुनीता मोहोड इत्यादींनी सहकार्य केले. शिबिरामध्ये बीपी, शुगर, टीटी व इतर आजारांचा आरोग्य तपासणी करून त्यावरील औषधांचा लाभ 208 सफाई कामगारांनी घेतला. या आरोग्य शिबिराचे आयोजन अध्यक्ष रूपचंद सोनटक्के, सचिव सुभाष साहारे, कोषाध्यक्ष गणेश मेश्राम, सदस्य सुशील गजभिये, सपना मकरंदे, पवन गारवे, रूपचंद गेडाम, यांच्या योगदानामुळे सफाई कामगारांबाबत घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांचा कार्यक्रम सुरक्षितपणे यशस्वी झाला. शहराची स्वच्छता ठेवणाऱ्या सफाई कामगारांच्या आरोग्याची काळजी मनपा प्रशासनाने वेळोवेळी घेण्याकरिता असेच आरोग्य शिबीराचे आयोजन घेण्यात यावे. असे एका पत्रकात म्हटले आहे.