लंडनला उच्च शिक्षणा करिता जाणाऱ्या आकाश नवघरेंचा नेहरू विद्यालयातर्फे सत्कार

लंडनला उच्च शिक्षणा करिता जाणाऱ्या आकाश नवघरेंचा नेहरू विद्यालयातर्फे सत्कार



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, प्रतिनिधी

हिंगणा :- स्थानिक नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आकाश वासुदेव नवघरे या विद्यार्थ्याला शाश्वत शेती, अन्न व पोषण सुरक्षा या विषयाचा अभ्यास करण्या करिता ब्रिटिश सरकारने चेव्हनिंग शिष्यवृत्ती व वर्ल्ड बँक शिष्यवृत्ती जाहीर केली. त्या निमित्त विद्यालयातर्फे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आकाश नवघरे यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना आकाश यांनी सांगितले की यश हे निरंतर प्रक्रियेच्या माध्यमातून मिळत असते व त्यासाठी सातत्यता गरजेचे असते. मी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून सुद्धा शेती, अन्नसुरक्षा, बीजोत्सव या विषयांकडे वळलो कारण आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून असल्याने त्यात खूप काही करायला वाव आहे. तसेच पुढे बोलताना आकाश यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासात आलेले सर्व शिक्षक, शाळा, महाविद्यालय, आणि आपल्या पालकांना दिले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी आकाश नवघरे यांना शुभेच्छा दिल्या व तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आकाशचे अनुकरण करून तालुक्याचे नाव मोठं करावं अशी अपेक्षा उपस्थिती विद्यार्थ्यां कडून व्यक्त केली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद नागपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, संचालक महेश बंग, संचालिका अरुणा बंग, मुख्याधापक शशिकांत मोहिते, विनायक इंगळे,आकाशचे आई- वडील यांचेसह विद्यालयातील विध्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद महाल्ले यांनी तर आभार अमोल हिरडकर यांनी मानले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles