
द्रौपदी मुर्मू यांना सपा, बसपासह जनसत्ता दलाचा जाहीर पाठिंबा
नवी दिल्ली: देशात १८ जुलैला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांच्या मोर्चेबांधणीला मोठा धक्का दिला आहे. मुख्यमंत्री योगी यांच्या पुढाकाराने काही नेत्यांनी पक्षाच्या सीमा ओलांडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवार, ८ जुलै रोजी लखनौला एनडीएच्या खासदार आणि आमदारांकडून पाठिंबा मागितला होता. यादरम्यान मुख्यमंत्री योगी यांनी द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ त्यांच्या अधिकृत निवासस्थानावर मेजवानीचे आयोजन केले होते. या मेजवाणीला भाजपाच्या मित्रपक्षांच्या नेत्यांशिवाय, समाजवादी पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीत असलेले सुहेलदेव, भारतीय समाज पक्षाचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, प्रगतिशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभर, प्रगतशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल सिंह यादव हे सुद्धा सामील होते. या मेजवाणीदरम्यान दोन्ही नेत्यांनी राष्ट्रपती पदासाठी द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. द्रौपदी मुर्मू यांना भाजपा, अपना दल, निर्बल भारतीय शोषित हमारा आम दलाच्या खासदार आणि आमदारांनी पाठिंबा दिला आहे.