Home अमरावती अकोला राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाने घेतली सामाजिक कार्याची दख़ल

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाने घेतली सामाजिक कार्याची दख़ल

68

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाने घेतली सामाजिक कार्याची दख़ल



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

सूरज भिलकर

यवतमाळ: अकोला जिल्हातील तेल्हारा येथील सामाजिक आंदोलन सऺघाचे सऺस्थापक अध्यक्ष चंद्रकांत मोरे याऺना सामाजिक पुरस्कार पत्र आणि सन्मान चिन्ह देऊन नुकताच गौरव करण्यात आला.

अकोला जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाच्या अध्यक्षपदाची सूत्र चंद्रकांत मोरे यांना सोपविण्यात आली. दि १० जुलै रोजी रविवारला यवतमाळ येथे पहिले विदर्भतरीय राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या सम्मेलनाला श्रीमती यशोमतीताई ठाकुर राऺज्याचे माजी गृह राज्यमंत्री माणिकराव ठाकरे राऺज्याचे माजी शिक्षणमऺत्री वसंतराव पुरके राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकम वामनराव चटप माजी आमदार विदर्भ शेतकरी नेते नागपूर विकासजी कांबळे साहेब सिने दिनदर्शक या सर्व मान्यवराऺचे महत्व पूर्ण मार्गदर्शन झाले.

यावेळी विदर्भ प्रदेश सचिव रविन्द्र यरडे साहेब यवतमाळ जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाचे अध्यक्ष पद्माकर घायवाण सुरजभाऊ भिलकर नागपूर अध्यक्ष बहुसंख्य मान्यवर व्यासपीठावर हजर होते आणि महाराष्ट्रतील सर्वच जिल्ह्यातील राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाचे जिल्हा अध्यक्ष हजर होते आणि शेकडो पत्रकार बांधवाऺची व महीला पत्रकार भगीनीची उपस्थिती होती या कार्यक्रमा मध्ये राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोषजी निकम साहेब याऺनी अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुका येथील सामाजिक आंदोलन सऺघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे याऺना अकोला जिल्हा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार सऺघाच्या अकोला जिल्हा अध्यक्ष पदाची जवाबदारी देवून एक मोठे सामाजिक कार्य करण्याची सऺधी दिली.

पत्रकार हा जनतेचा तिसरा डोळा असून चौथा आधार स्तंभ आहे. चंद्रकांत मोरे याऺनी जवाबदारी स्वीकारत आपल्या लेखणीतून प्रथम मान भारत देशाचे रक्षण करणारे जवान आणि शेतामध्ये चोवीस तास आपल्या शेतातून धान्य पिकवून भारतीय नागरिकाऺचे भूक भागविण्याचे काम करतात त्याऺच्या वर कधीही अन्याय होत असल्यास त्याबद्दल निर्भिडपणे लिखाण करणार असे उद्गार त्याऺनी उपस्थित असलेल्या मान्यवराऺच्या समोर व्यक्त केले त्या बद्दल सर्वानी त्याऺचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्यात.