बसपाचे जिल्हाधिकारी नागपूर यांना तहसीलदार हिंगणा यांच्या मार्फत निवेदन

बसपाचे जिल्हाधिकारी नागपूर यांना तहसीलदार हिंगणा यांच्या मार्फत निवेदन



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर

_पावसामुळे जिवीतहानी झालेल्या परिवाराला तातडीने सर्व मदत द्या_

हिंगणा: परिसरात रविवार दि. १०/७/२२ला संततधर मुसळधार पाऊस झाला, सायंकाळी ७ वाजता नंतर अधिकच जोर धरत पावसाने अचानक वेग वाढवला त्यादरम्यान हिंगणा तालुक्यातील ईसासनी ग्रामपंचायत मधुल, भिमनगर वार्ड क्र ३ मधिल रहिवासी सुखवंती राधे मात्रे वय किमान ४५ वर्षे, व यांची मुलगी अंजली राधे मात्रे वय किमान १८ वर्षे या दोघी मायलेकी पावसाने वाहून गेल्या त्यात निधन झाले असून सुखवंतीचे पार्थिव सापडले असून मुलगी अंजलीचे पार्थिवाचा शोध घेणे प्रशासनाद्वारे सुरु आहे.

तसेच वार्ड क्र.५ पंचशील नगर येथील नागरिक अस्मिता टेंभूर्णे , सहादेवजी बांगर, सचिन कदम, अमोल कदम, पवन पटले, ओमकार धूवारे यांच्या राहत्या घरात जमिनी पासून १ मिटर उंची पर्यंत पावसाचे पाणी शिरले त्यामुळे घरातील अन्यधान्य, कपडे, जिवनापयोगी साहित्य वाहून गेले, त्यामुळे ह्या परिवाराची उपासमारीसह वाताहत झाली असून या सर्व परिवाराला सुरक्षा प्रदान करण्यासह आर्थिक नुकसान भरपाई त्वरित मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन बसपाच्या वतिने जिल्हाधिकारी नागपूर यांना तहसीलदार हिंगणा यांच्या मार्फत देण्यात आले.

प्रसंगी बहुजन समाज पार्टी हिंगणा विधानसभा अध्यक्ष महेश वासनिक, नागपूर जिल्हा सदस्य सुरेश मानवटकर, प्रशांत दिवे, अस्मिता टेंभूर्णे, राजेश टेंभूरकर, प्रफुल्ल मेश्राम, विजय राऊत बसपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles