ओबीसी हिंदूच आहे, त्याला शेंडी जाणव्याच्या हिंदूत्वापासून वाचवलं पाहिजे!

ओबीसी हिंदूच–काल पुर्वार्ध वाचला. आज उत्तरार्ध वाचा– प्रा श्रावण देवरेपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

ओबीसी हिंदूच आहे, त्याला शेंडी जाणव्याच्या हिंदूत्वापासून वाचवलं पाहिजे!

*(उत्तरार्ध)*

1994 साली आम्ही देवरे कुळातील काही लोकांनी धनदाई कूलमातेच्या यात्रेत *‘‘देवरे कूलधर्म परीषद’’* आयोजित केली होती. या परीषदेत आम्ही कूलधर्म हा जगातील पहिला धर्मपूर्व धर्म असल्याचे सांगीतले. या कूलधर्माचा उगम सिंधू संस्कृतीत झाल्यामुळे पुढे त्याला परकीयांच्या आगमनामुळे हिंदू नामाभिमान प्राप्त झाले व त्याला धर्माचे स्वरूप प्राप्त झाले. *मूळ सिंधू संस्कृतीशी नाळ जुळलेला हिंदू धर्म व नंतर आलेल्या आर्य आक्रमकांनी विकृत केलेला हिंदू धर्म यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे.* भारतात अनेक आक्रमक आलेत परंतू सर्वात मोठे आक्रमक, विध्वंसक आर्य होते. त्यांना केवळ या सूजलाम-सुफलाम प्रदेशात येऊन राहायचे नव्हते तर त्यांना त्यांच्या वर्चस्वाची वसाहत येथे निर्माण करायची होती, म्हणून त्यांनी सिंधू संस्कृतीचा विनाश करायला सुरूवात केली. कारण त्यांना येथे केवळ गुण्या-गोविंदाने राहायचे नव्हतं तर मूळनिवासी सिंधू-हिंदु जनतेचं शोषण करून मौज-मस्तीचं जिवन जगायचं होतं.

स्त्रीसत्ताक गणसमाजात शेती म्हणजे क्षेत्र ज्यांच्या हातात होती, त्या स्त्रीयांचा क्षत्रवर्ण होता व पुरूषांचा ब्रह्मणवर्ण असे दोनच नैसर्गिक वर्ण (विभाग) होते. लाकडी नांगरांच्या साहाय्याने शेती करणारा मातूवंशक पुरूषसत्ताक गणसमाज आल्यावर क्षेत्र म्हणजे शेती पुरूषांच्या ताब्यात गेल्याने त्यांचा क्षत्रिय वर्ण झाला. ब्रह्मण ऋषी-पुरोहितांचा ब्राह्मणवर्ण झाला. स्त्रीया गण-कार्यातून व राज्यकारभारातून हद्दपार झाल्याने वर्णहीन झाल्यात. लाकडी नांगरामुळे शेतीचा विस्तार शक्य झाला, परंतू त्यासाठी अधीकाधिक मानव-शक्तीची गरज होती. पुर्वी हस्त शेतीतून वरकड उत्पन्न होत नसल्यामुळे टोळी युद्धातील पराजीत गणाच्या सदस्यांना जिवे मारून टाकले जात होते. *मातृवंशक पुरूषसत्ताक गणसमाजात उत्पादन साधनांचा (लाकडी नांगर) विकास झाल्यामुळे वरकड उत्पादन शक्य झाले होते, त्यामुळे टोळी युद्दातील पराजित गण सदस्यांना जीवे मारण्याऐवजी त्यांना नांगराला जुंपले गेले व वरकड उत्पादन वाढविले गेले. त्यामुळे दासांना पोसणे शक्य झाले. यातून तिसर्‍या दासवर्णाची निर्मिती झाली.*

नेमके याच काळात आर्यांची वसाहतवादी आक्रमणे सुरू झालीत. या आक्रमणांना कडवा विरोध करण्यासाठी अनेक मुळनिवासी राज्यांनी युद्धे केलीत. दशावतारातील वराह, नरसिंहा, वामनासारखे त्यांचे अवतारपुरूष हे या युद्धातील आर्य-सेनापती होते. नरकासूर, हिरण्याक्ष, बळी यासारखे मुळनिवासी हिंदू राजे आर्यांची आक्रमणे परतून लावण्यासाठी प्रतियुद्धे करीत होती. परंतू मूळनिवासींमध्ये रामासारखे क्षत्रिय राजेही होते, जे आर्य आक्रमकांना जाऊन मिळाले. क्षत्रिय-सरंजामदारांची ब्राह्मणांना फितुर होण्याची परंपरा रामाइतकी प्राचीन आहे, ती आजच्या एकनाथी रामायणापर्यंत येऊन पोहोचते. रामाच्या नेतृत्वाखाली व विश्वामित्र सारख्या ब्रह्मण ऋषींच्या मार्गदर्शनाखाली ताटका, शुर्पणखेचा स्त्रीसत्ताक गणसमाज व मंदोदरीचा रावणशासित मातृवंशक गणसमाज नष्ट करून त्याजागी चातुर्वर्ण पुरूषसत्ताक गणसमाज स्थापन करण्यात आला. *दशावतारातील युद्धांमुळे आर्यांची घुसखोरी स्थीर-स्थावर झाली. त्यांच्या वसाहती स्थापन झाल्यात. दशावतारी युद्धकाळ संपल्यानंतर शांततामय सहअस्तित्वाचा काळ सुरू झाला.* या काळात आर्यांची ब्राह्मण वर्णात घुसखोरी गतिमान झाली व त्यातून त्यांची सांस्कृतिक साहित्य निर्मितीही वाढली. सर्वप्रथम त्यांनी कृषीमायेचे मंत्र असलेली तात्रिकी श्रूती विद्रूप करून वैदिक श्रुती निर्माण केली. यज्ञसंस्थेची निर्मिती करून त्याद्वारे आर्य-ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण केले. समाजातील वरकड उत्पादनाचे शोषण करण्यास आर्यांची कृत्रिम वैदिक संस्कृती पोषक असल्यामुळे तीला रामासारख्या राजांनी आश्रय दिला.

आर्यांच्या वैदिक साहित्यामध्ये वैदिक धर्म असा कुठेही उल्लेख नाही, त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीच्या साहित्यामध्येही धर्माचा उल्लेख नाही. कारण धर्म ही संस्थाच त्या काळात नव्हती, त्यामुळे आर्य-ब्राह्मण व मुळनिवासी भारतीय यांच्यातील हा संघर्ष सांस्कृतिकच होता. गुलाम व शूद्रांच्या श्रमातून भरपूर वरकड उत्पन्न होत असल्यामुळे बाजार व व्यापार वाढला. *चातुर्वर्णव्यवस्थेत शेती कसणार्‍या शेतकर्‍याला व व्यापार करणार्‍यांना वैश्य वर्णात समाविष्ट केले गेले. शेतीसाठी अवजारे बनविणारे सुतार, लोहार व सेवा करणार्‍या नाभिक, धोबी यांना चौथ्या शूद्र वर्णात ढकलले गेले.*
हा शुद्रवर्ण म्हणजेच आजचा ओबीसी होय! या ओबीसीसमाज घटकाला कायमचे गुलाम बनविण्यासाठी सांस्कृतिक गुलाम बनविण्यात आले. कारण गुलाम हा आपल्या संस्कृतीतून प्रेरणा घेऊन बंड करत असतो. या त्याच्या सांस्कृतिक प्रेरणा नष्ट करण्यासाठी आर्यांनी ओबीसी-बहुजनांचा इतिहास विद्रूप केला. प्रत्यक्ष इतिहासात बळीराजा लढला व जिंकला. परंतू पुराणे लिहितांना ब्राह्ंणांनी अशा पद्धतीने लिहीली कि जेणे करून लढण्याचा इतिहासच नष्ट व्हावा! तुमचा बळीराजा आमच्याशी लढलाच नाही, बस्स, तीन पाऊले जमीन वामन नावाच्या ब्राह्मणाने मागीतली व बळीने आख्ख त्रिलोकीचं राज्य ब्राह्मणांना देऊन टाकलं. *‘तुमचा बळीराजा न लढताच पराभूत झाला, त्याचप्रमाणे ओबीसींनो तुम्हीसुद्धा आमच्याशी न लढता, तुमच्या कष्टाची कमाई आम्हाला दान करून आमच्या झोळीत टाका!’ असा गुलामीचा संदेश पिढ्यानपिढ्या या भाकड पुराणांमधून आमच्या मनावर बिंबवला गेला.*

मुळात रूढ अर्थाने हिंदू हा धर्मच नाही, तर ती विकसनशिल संस्कृती आहे. धर्माच्या व्याख्येप्रमाणे हिंदूंचा कोणताही एक प्रमाणग्रंथ नाही, एक संस्थापक नाही, कोणताही एक प्रमाणभूत देव अथवा देवी नाही, मक्कामदिना, जेरूसलेमसारखे कोणतेही एक पवित्रस्थळ नाही, कोणताही एक कायदा अथवा कोड नाही. सिंधू संस्कृतीचा गाभा असलेली समतावादी मातृसत्ताकता व स्त्रीसत्ताकता जेव्हा भारताच्या इतर भागात विस्तारीत होऊ लागली, तेव्हा सिंधू हे प्रादेशिक नाव जाऊन हिंदू हा शब्द व्यापक अर्थाने स्वीकारला गेला. *धर्म हा प्रमाणभूत ग्रथांमध्ये व प्रार्थनास्थळांमध्ये कर्मकांडी होऊन डबके बनतो, तर संस्कृती ही आपापल्या भौगोलिक प्रदेशातील नीतीनियमांप्रमाणे व गरजेप्रमाणे विकसनसिल प्रवाह असते.*

गुलामांचा व शोषकांचा धर्म एक असू शकतो, परंतू संस्कृती एक असू शकत नाही. शूद्र ओबीसींची संस्कृती ही सिंधूप्रणित हिंदू संस्कृती आहे व शोषक आर्य-ब्राह्मणांची संस्कृती ही वैदिक आहे व ती सिंधू-हिंदू संस्कृतीचे विकृतीकरण करून अनैसर्गिकपणे निर्माण करण्यात आलेली आहे.

*शोषक शोषण करतांना गुलामांना असे भासवतो की, ‘तुम्ही परके नाहीत व आम्हीही परके नाहीत, आपण सर्व एकच आहोत, आपण सर्व हिंदू आहोत, असे ते भासवितात.* परंतू प्रत्यक्षात हे सत्य नाही. ब्राह्मण हे सिंधूप्रणित हिंदू संस्कृतीचे नाहीत, हे आजही अनेक पुरावे देऊन सिद्ध करता येते. 1994 साली झालेल्या देवरे कूलधर्म परीषदेत आम्ही हे विस्ताराने मांडलेले आहे. फरक पुढिलप्रमाणे-

1) *‘‘इडापिडा जाओ! बळीचं राज्य येवो!!’’* असे दिवाळी दसर्‍याला ओबीसी बहुजन स्त्रीया आजही म्हणतात. म्हणजे बळीराजाला आदर्श राजा मानणारे ओबीसी बहुजन जवळपास 95 टक्के आहेत व ते हिंदूच आहेत. परंतू साडेतीन टक्के ब्राह्मणही स्वतःला हिंदू म्हणत असतील तर ते बळीराजाला अत्याचारी क्रूर राजा म्हणून दर दिवाळी-दसर्‍याला त्याचा खून का करतात?
2) शूद्र ओबीसी कमरेत दोरा घालतो, मात्र ब्राह्मण गळ्यात दोरा घालून त्याला पवित्र धागा समजतो.
शूद्र आपली शेंडी कूलमातेला वाहण्यासाठी ठेवतो, मात्र ब्राह्मण गाठ मारण्यासाठी शेंडी ठेवतो. शूद्र राज्याचा विनाश करण्यासाठी प्रतिज्ञा घेतांना तो शेंडीला गाठ मारतो.
3) *ओबीसी शूद्र हे कूलाला प्राधान्य देतात.* कूल हे कूलमातेपासून येते. ते आजही मातृसत्ताक संस्कृती मानतात. ब्राह्मण हे गोत्राला प्राधान्य देतात. गोत्र हे पुरूष ऋषींकडुन येते, कारण ब्राह्मण पशूपालक पुरूषसत्ताक संस्कृतीतून आलेले आहेत व ते आजही पुरूषसत्ताकवादीच आहेत.
4) *लग्न जुळवायला जातांना शूद्र ओबीसी सर्वप्रथम ‘मामाचं कूळ’ विचारतो, कारण भाऊ-बहिणमध्ये लग्न लागणार नाही, याची तो काटेकोरपणे काळजी घेतो.* त्यामुळे ओबीसी-बहुजनांमध्ये मामा-भाचा एकाच कुळाचे असू शकत नाहीत. ब्राह्मण लग्न जुळवतांना गोत्र विचारतात. त्यामुळे ब्राह्मणांमध्ये मामा-भाचे एकाच कूळाचे असू शकतात व भाऊ-बहिणमध्ये लग्न लागू शकते. उदाहरणार्थ- महाराष्ट्राचे माजी मुख्मंत्री मनोहर जोशी हे भाचे व त्यांच्याच मंत्रीमंडळातील शिक्षणमंत्री सुधीर जोशी हे मामा! मामा व भाचा एकाच कूळाचे! त्यामुळे त्यांचे लग्न भाऊ-बहिणमध्ये लागलेले आहे, असा त्याचा अर्थ होतो.
5) *काही अपवाद वगळता कूलमातांच्या व मातृदेवतांच्या गाभार्‍यात ब्राह्मणांना प्रवेश निषिद्ध आहे.* या देवतांच्या गाभार्‍यात ओबीसी-बहुजनच पुजारी म्हणून प्रवेश करू शकतात. बहुतेक ठिकाणी गुरव जातीचेच पुजारी असतात, कारण ओबीसी बहुजनांचे अधिकृत पुजारी गुरव आहेत, ब्राह्मण नव्हे! ब्राह्मण हे परकीय वैदिक धर्माचे असून सिंधू-हिंदू धर्मात बळजबरीने घुसलेले आहेत, हेच यावरून सिद्ध होते.

अशी अनेक उदाहरणे देता येतील, ज्यामुळे आजही सिद्ध करता येते की ब्राह्मणांचे हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचे असून शूद्र ओबीसींवर गुलामगिरी लादण्यासाठी त्यांनी हा कृत्रिमपणा केला आहे, हे तात्यासाहेब महात्मा फुले यांनीही सिद्ध केले आहे. म्हणून *तात्यासाहेब महात्मा फुले वारंवार आवाहन करतात कि, भट-ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून लवकरात लवकर मुक्त व्हा व समतावादी मातृसत्ताक संस्कृतीचे बळीराज्य आपल्या देशात आणू या!* धन्यवाद!

*लेखक- प्रा. श्रावण देवरे*
ईमेल- s.deore2012@gmail.com

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles