‘धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास’ प्रशिक्षण वर्ग बुधवारपासून

‘धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास’ प्रशिक्षण वर्ग बुधवारपासून



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: एक आदर्श जीवनप्रणाली अंगीकृत करण्यासाठी वर्षावास हा सुवर्ण कालखंड मानला जातो. याच पार्श्वभूमीवर मिशन धम्म प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षित व पारंगत प्रचारक, भिक्खू -भिक्खूनी यांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने दीक्षाभूमी येथे प्रभावी ‘धम्म प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास’ या (सर्टिफिकेट कोर्स) निःशुल्क वर्गाचे आयोजन येत्या १३ जुलै पासून (आषाढ़ पौर्णिमा) ते १० सप्टेंबर २०२२ (भाद्रपद पौर्णिमा) पर्यंत करण्यात येत आहे, अशी माहिती वर्ल्ड धम्म मिशन फाउंडेशनचे प्रशिक्षक सुभाष शेंडे यांनी आज शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

वर्ल्ड धम्म मिशन फाऊंडेशन, इंटरनॅशल बुध्दिष्ट युथ कौन्सिल IBYC बुध्द धम्म प्रचार समिती, विश्व मैत्रेय बुध्दिष्ट संघ, समता सैनिक दल, महाप्रजापती गौतमी एज्युकेशनल फाऊंडेशन, वर्ल्ड बुध्दिष्ट वुमेन्स फोरम व इतर आंबेडकरी व बुध्दिष्ट संघटनाच्या संयुक्त विद्यमाने वर्षावासानिमित्य या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

हे प्रशिक्षण इंग्रजी, मराठी व हिंदी भाषेतून दररोज दुपारी १२ ते २ या कालावधीत दिल्या जाईल. इच्छुक विद्यार्थी श्रामनेर व श्रामनेरी बनून सुध्दा प्रशिक्षण घेवू शकतील, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी पत्रपरिषदेत विवेक खोब्रागडे, डॉ.चरणजीत जनबंधू, डॉ.नीना वानखेडे, सुधा जनबंधू, सुषमा कलमकर आणि आशा शेंडे आदी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles