अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई द्या

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची शेतकऱ्यांना भरपाई द्या



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_नागपूर तालुका अतिवृष्टी जाहीर करा : वाडी मनसेतर्फे मागणी_

अनिल पारखी वाडी

नागपूर: जिल्ह्यातील अनेक ग्रामिण भागात मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभे पीक उध्वस्त झाले असून शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, दुबार पेरणीचे संकट तालुक्यातील शेतक-यांवर ओढावले आहे.

नागपूर तालुक्यातील झालेल्या शेतीच्या नुकसानीची तत्काळ पाहणी करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या व तसेच नागपूर तालुका अतिवृष्टी म्हणून जाहीर करा. ही प्रमुख मागणी मनसे वाडी नी केली आहे.

नागपूर तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून पाऊस चालू आहे. नागपूर तालुक्यातील शेतकरी बांधवाना बसला आहे. या विभागातील अनेक गावातील पाण्यामुळे माल खराब झाले आहे. शेकडोच्या वर शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी बांधवाना नुकसानभरपाई म्हणून आर्थिक मदतीची गरज आहे.

पूर परिस्थितीची तात्काळ पाहणी करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी व तसेच नागपूर तालुका अतिवृष्टी म्हणून जाहीर करा या मागणीसाठी वाडी मनसे च्या वतीने मागणी करण्यात आली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles