गडचिरोलीतील पूरग्रस्तांना मदत कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

गडचिरोलीतील पूरग्रस्तांना मदत कमी पडू देणार नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

नागपूर: विदर्भात मागील ३ दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसाने गडचिरोली जिल्ह्यास अक्षरश: झोडपून काढले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. पूर परिस्थितीमुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या दौऱ्याकरिता नागपूरवरून रवाना झाले.
राज्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. गडचिरोलीतील पूरगास्तांना मदत कमी पडू देणार नसल्याचे सूतोवाच एकनाथ शिंदे यांनी केले ते नागपुरात दाखल झाले असता प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान “पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आम्ही मुंबईहून गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी निघालो आहोत,” असे ट्विट उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. विविध भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे गडचिरोली जिल्हयात गेल्या काही दिवसांपासून पाणी साचल्याने आणि संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आपल्या हवामान बुलेटिनमध्ये नमूद केले आहे की, “09 तारखेला गुजरात आणि मध्य महाराष्ट्रात 09 आणि 10 तारखेला सौराष्ट्र आणि कच्छमध्ये खूप मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles