Home ताज्या घटना यवतमाळ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पहिले विदर्भस्तरीय संमेलन संपन्न

यवतमाळ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पहिले विदर्भस्तरीय संमेलन संपन्न

50

यवतमाळ येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे पहिले विदर्भस्तरीय संमेलन संपन्नपुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

_न.मा.जोशी व अनिरुध्द पांडे यांना पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कार_

सतीश भालेराव नागपूर

नागपूर : पत्रकार हा लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ असूनही तो अनेक मुलभूत सुविधांपासून वंचित आहे, त्याच्या संरक्षणाचा प्रश्न मागे पडला आहे, तो लोकशाहीचा महत्वाचा घटक असूनही निराधार असल्याचे परखड मत विदर्भवादी नेते माजी आमदार वामनराव चटप यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ विदर्भ प्रदेशव्दारा दिनांक १० जुलै रोजी आयोजित पहिल्या विदर्भस्तरीय पत्रकार संंमेलनात स्व.शरदराव आकोलकर परिसर सहकार भवन येथे स्व.अतुल पांडे विचारमंचावरुन ते बोलत होते.

यावेळी माजी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी जसे शिक्षक मतदार संघातून त्यांचा प्रतिनिधी आमदार म्हणून विधानसभेत पाठविल्या जातो तसेच पत्रकारांमधूनही दोन प्रतिनिधी विधानसभेत पाठविण्यात यावे असा ठराव घेण्याची सुचना केली, माजी शालेय शिक्षणमंत्री प्रा.वसंतराव पुरके, यवतमाळ जिल्हा मध्यवती बँकेचे संचालक राजुदास जाधव, ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी, तरुण भारतचे अनिरुध्द पांडे, मराठी सिनेदिग्दर्शक विकास कांबळे, अंकुल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा विद्याताई खडसे या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष निकम हे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्व.शरदराव आकोलकर, स्व.मनोज बावनथडे व स्व.पप्पु येलमे यांच्या प्रतिमांजवळ मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. यावेळी स्वागताध्यक्ष राजुदास जाधव, माणिकराव ठाकरे, प्रा.वसंंतराव पुरके, यांनीही आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमात विचारमंचाला पत्रकार स्व.अतुल पांडे विचारपीट असे नाव देण्यात आले होते. या संमेलनात यवतमाळसह संपूर्ण विदर्भातून आलेल्या पत्रकारांना पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये ज्येष्ठ पत्रकार न.मा.जोशी, अनिरुध्द पांडे, यांना जीवनगौरव पुरस्कार व सहकार क्षेत्रातील जीवन गौरव पुरस्कार राजुदास जाधव सर व गोदावरी अर्बनचे धनंजय तांबेकर यांना देण्यात आला. याशिवाय सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार यवतमाळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाई अमान यांना देण्यात आला.

पत्रकारांचे विदर्भस्तरीय पत्रकार संमेलन प्रथमच यवतमाळात होत असल्याने पावसाचे वातावरण असुनही अकराही जिल्ह्यातील पत्रकार मंडळी मोठ्या संख्येने या संमेलनास हजर होते. शेवटी या कार्यक्रमात तीन ठराव पारित करण्यात आले. ज्यामध्ये पहिला ठराव-पत्रकारांच्या सरंक्षणाच्या कायद्याची काटेकोरपणे व तातडीने अंमलबजावणी व्हावी, दुसरा-पत्रकांराची वैâफीयत मांडण्यासाठी पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून दोन आमदारांची विधानपरिषदेवर निवड करण्यात यावी व तिसरा-पत्रकारांना पेन्शन योजना त्वरीत लागु करावी असे तीन ठराव सर्वानुमते पारित करण्यात आले.
संमेलनाचे उत्कृष्ट संचालन कैलास राऊत यांनी केले तर संमेलनाचे प्रास्ताविक राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेशअध्यक्ष पदमाकर घायवान यांनी केले आभार विदर्भ संघटक अशोक उमरतकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ विदर्भ प्रदेशचे अध्यक्ष पदमाकर घायवान, विदर्भ प्रदेश सचिव रविंंद्र चरडे, विदर्भ प्रदेश संपर्क प्रमुख संतोष डोमाळे, विदर्भ संघटक विजय डांगे, महाराष्ट्र संघटक प्रफुल्ल मेश्राम, विदर्भ उपाध्यक्ष जर्रार खान, रामेश्वर पुदरवार, अनील पुलजवार (पाटणबोरी), सचिन पत्रकार, अनील गुंडेवार, अशोक उमरतकर (कळंब), डॉक्टर संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ.जी.एस. वानखडे, शेतकरी संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा कामडे, बांधकाम कामगार संघाचे जिल्हाध्यक्ष सुखदेव लिल्लारे, महिला संघाच्या कार्याध्यक्षा शांताबाई आसुटकर, भ्रष्टाचार निर्मुलन संघाच्या जिल्हाध्यक्षा मालती गावंडे, अंगणवाडी सेविका संघाच्या जिल्हाध्यक्षा उज्वला गणवीर, आशा वर्कस संघाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना भवरे, यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेश सोनोने, आरीफ सैयद, सैयद सलीम, प्रकाश वानखडे, अब्दुल रफीक, मुदस्सर नजर, सुधाकर पाटील, शांतीलाल गदई, भुजंग मेश्राम,दिपक सिंगारकर, महेंद्र चव्हाण, दशरथ मेश्राम, प्रदीप चांदेकर, नरेंद्र थुल, शकील शेख, राहुल ढळे, राहुल वसाके, अकबर पठाण, अंकुश मेश्राम, अमोल खोब्रागडे, आरीफुल्लाखान, नितीन पोकळे, आदींनी अथक परिश्रम घेतले.