पॅथॉलॉजी तपासणी शुल्कात होणारी लूट थांबवावी; दादा ठाकूर

पॅथॉलॉजी तपासणी शुल्कात होणारी लूट थांबवावी; दादा ठाकूर



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

प्रमोद गाडगे

बुलढाणा: संग्रामपूर तालुक्यातील पॅथॉलॉजी धारकावरून फी च्या नावाखाली होणारी लुट थांबवून दरपत्रक दर्शनी भागामध्ये लावण्या बाबत जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा मार्फत संग्रामपूर तहसीलदार यांना राजपूत करणी सेना विदर्भ युवा अध्यक्ष दादा ठाकूर यांनी निवेदन दिले.

संग्रामपूर तालुक्यामध्ये व इतर खेड्यापाड्यांमध्ये पॅथॉलॉजी लॅब आहेत या पॅथॉलॉजी रुग्णांचे रक्त लघवीचे नमुने तपासणीचे काम केले जाते. मात्र तपासणी करत असताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक लॅबचा शुल्क हे वेगवेगळे असतात. तपासणी ही वेगवेगळी असते, मात्र एका आजाराच्या तपासणीचे शुल्क वेगवेगळ्या लॅब मध्ये वेगवेगळे आकारले जाते. त्यामुळे हा प्रकार काय आहे हे न समजणारे जणू काही कोडे झाले आहे.

तसेच या प्रकारामुळे आधीच आजारामुळे त्रस्त असणाऱ्या रुग्णांना आणखी आर्थिक व मानसिक त्रास देण्याचा प्रकार असून , गोरगरीब जनतेची सरासर लूटच आहे. त्यामुळे पॅथॉलॉजी लॅब धारकांना दर्शनी भागामध्ये दरपत्रकाचे फलक लावण्याचे सूचित करण्यात येऊन गोरगरीब जनतेची तसेच रुग्णांची लूट थाबवण्यात यावी. त्यामध्ये अनेक गावांमध्ये बोगस पॅथॉलॉजी लॅब थाटण्यात आल्या असून,त्यांच्याकडे अधिकृत परवाने नसल्याची बाबसमोर येत असतानाही अशा पॅथॉलॉजी लॅब धारकावर आरोग्य विभागाकडून कारवाई का करण्यात येत नाही ,असाही प्रश्न उपस्थित होतो.

पॅथॉलॉजी लॅब धारकांकडून गोरगरिबांची रुग्णांची लूट थांबवण्या करिता तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. अन्यथा संग्रामपूर तालुक्यामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा राजपूत करणी सेना विदर्भ युवा अध्यक्ष दादा ठाकूर यांनी दिला. संग्रामपूर तालुक्यातील तहसीलदादांना सहीनिशी निवेदन देताना राजपूत करणी सेना विदर्भ युवा अध्यक्ष दादा ठाकूर ,जितु ठाकुर,अनिकेत ठाकुर, शक्ती ठाकूर, आकाश दाणे, सोपान रामेश्वर दाणे इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles