पाऊस…. जीवलग सखा..!!

पाऊस…. जीवलग सखा..!!पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

इंदू मुडे, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

भरून आलेलं आभाळ आणि हलकीच वाऱ्याची झुळूक, ओढ लावून जात मनाला. आता पाऊस येणार. माझं आणि पावसाचं, बालपणापासूनचं अनोख नातं. रिमझिम पावसात छत्रीविना बाहेर पडायचं आणि चिंब भिजून घरी परतायच, हा माझा अनोखा छंद. अंगणात जमलेल्या पावसाच्या पाण्यात, कागदी होड्या सोडायच्या आणि ती हेलकावे घेतं सरळ धारेला लागली की, माझा आनंद गगनाला भिडायचा. माझ्या बालपणीचा टपटपणारा पाऊस,आजही मला वेडं लावतो. त्याचा अलौकिक स्पर्श माझ्या तनामनास सुखावतो. मुसळधार पाऊस, रिपरिप पाऊस, अल्लड वळीवाचा पाऊस, झिम्माड पाऊस, त्यांच प्रत्येक रूप मला मोहित करतो, आनंद देतो. हवेत रेषा मारल्यासारख्या, त्याच्या झरझर सरी ओंजळीत झेलतांना चिंब चिंब भिजायला मला फार आवडतं. मग चिंब भिजलेल माझं मन पाऊस पाऊस होतं.

पावसात भिजताना, मनाचही आभाळ दाटून येतं, अश्रूना मोकळ्या वाटा देवून, मन मोकळ करता येतं. ओघळणाऱ्या अश्रूना अलगद पणे तो हि स्वतःत समावून घेतो कुणाला दिसण्या आधी. मिठीत घेऊन मायेने गोंजारतो तर कधी, गडगडात करीत खूप क्रोधित होतो. त्याची माझ्यावरची माया.. मला अलगद जाणवते. पावसाशी मैत्री जपत मी लहानची मोठी झाले, पण पाऊस आजही तसाच.. अल्लड, हसरा, लाजरा, माझ्या मनाचं गुज अलगद टिपणारा.
एक सांगते. कदाचित तुम्हाला काल्पनिक वाटेल पण खरंय….! ब्रम्हपुरी, जणू उष्णतेचं माहेरघरचं. जगातील सर्वात उष्ण असलेल्या टॉप टेनच्या यादी मध्ये नावं असतेच. मग फार अडचणीचा सामना करावा लागतो. पाण्याची पातळी खूप खोल जाते. पाणी जपून वापरावे लागते.

माझा जिवलग सखा पाऊस, निसर्गाला नवं पण देणारा हा पाऊस…. कुणाला आवडत नाही, लहान असो , मोठे, सर्वाना, चिंब भिजण्याचा मोह आवरता येतं नाही. आकाशातील स्पतरंगी इंद्रधनू, जणू, झोपाळाचं वाटतो,.. माझं भिजलेल मन त्यावर अलगद झोके घेतं. सृष्टी सौन्दर्यात भर घालणारा पाऊस… माझा सखा… मला फार आवडतो. निसर्गातील सृजन सोहळ्याचा खरा शिल्पकार पाऊस.. कणाकणात, मनामनात नवचैतन्य भरणारा पाऊस. बीजाचे रोप करणारा पाऊस.. मातीची तहान भागवणारा पाऊस… वसुंधरेला नववधू प्रमाणे हिरवाईचा साजशृंगार देणारा पाऊस… पाऊस म्हणजे जीवन.. पाऊस म्हणजे प्रवाही असणे.. पाऊस म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीला नवसंजीवनी देणारा अमृतकलश अशी किती रूपे वर्णावी पावसाची… अगणित रूपात जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला पाऊस… ज्याची हौस कधीच फिटता फिटत नाही. ज्याच्याशी जुळलेले अतूट नाते कधीच तुटता तुटत नाही.

इंदू मुडे, ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles