मनातले बोधामृत !

मनातले बोधामृत !पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

✍️सिंधू बनसोडे, इंदापूर, जि.पुणे

मनाला शुद्ध सात्विकतेची जोड असली की ..मन हे चांगलं शोधायला लागतं ..चुकत चुकत शिकत असतं ..आपण चुकलो कुठं याची जाणीव होऊन नकरात्मकतेतून सकारात्मक विचार करतो .एकदा का सकारात्मक विचार आला की मनाला आनंद होतोच! कधी कधी नकळत चुकतो ..चुकतो असा की त्यातच वाहवत ! जातो .काम ,क्रोध,लोभ मत्सरात ,एवढं बुडतोकी स्वतःला विसरून जातो ! मग एखादी लहान मुलगी समोर येऊन बोलून जाते .आपलं वय काय ..आपण करतोय काय …तेव्हा तो अंतरीचा जाणीव करून जातो .अरे!किती बुडालो !यात …काय करतोय आपण ..आता तरी शहाणे व्हावे! ..तो अंतरीचा देव बोध सांगून जातो.

वाटतं ना..कधी कधी आपलं जवळचे आपल्याला चांगले म्हणत नाहीत .किंवा विशेष दिनी …सगळे विसरले आपल्याला ! या नकळत उदास भावनेत असताना ..कधी तोंड ओळख असते कधीची …ते जाता जाता पाहून येतं ..त्याच्याकडून अपेक्षाही नसते .नि म्हणतं ..छान वाटलं पाहून ..काय विशेष आहे का आज ..नाही म्हणतो आपण .पण वदवून घेऊन कौतुक करून निघून जातो ! तो अंतरीचा म्हणतो ! तो अंतरीचा बोध देतो ! तुला कशाला आपल्यांची गरज! ….मी आहे ना! सोबत तुझ्या ! कधी कधी ..डोळ्या समोर ..चुकीचं होत असतं ..आपण तोंड बंद करतो .न राहवून बोलतोच आपण .आपल्या बोलल्याने ..एकट्या पडलेल्या स्त्री जातीला किती मोठा आधार वाटतो ! त्या अनोळखीच्या चेहऱ्यावरचं समाधान ..आपल्याला समाधान देऊन जातं ..तो अंतरीचा सुखावतो ! छानच केलं बोध देऊन !

जिथं एखादी गोष्ट …किरकोळ असते, क्षुल्लक असते ..पण सांगणाराच पट्टीतला भेटतो …मोठं करून सांगतो ..तिथं मग व्यक्ती असो, किंवा वस्तू !गैरसमज होत असतानाच …एखादं दुसरं येतं ..धीर देऊन आत्मविश्वासात सांगतं ..नाही ते असं नाही .. तेव्हा कळतं तुझ्या तुलनेत त्याचे विचार पहा ..काय मोठं तत्वज्ञान थोडक्यात सांगून गेलं ! अंतरीचा नवीन काही शिकवून जातो . कधी कधी ….माणसांच्या गर्दीतून एखादं असं असतं की ..आपला एखादा बोल त्याच्या मनाला भावलेला असतो ! कुठं तरी ऐकलेलं असतं आपल्याला .वाचलेलं असतं ..तो आपल्याला अनोळखी असतो ! ध्यानी मनी नसताना आपल्या समोर येतो ! भरभरून कौतुक करून जातो ! तो आपुलकीची सक्की माय ..होऊन जातो! तेव्हा कळतं .अंतरीचा सांगतो तुझं ही आपुलकीचं कोणी आहे .

कधी कधी …आपल्याच नादात जगत असताना …आपल्या सख्यांना वेळ द्यायचा विसरतो ! आणि आपलंच आपल्याला ..आपलं मन न दुखवता…अहो ! जावो ! च्या भाषेत बोलतं, तेव्हा अंतरीचा जाणीव करून देतो ! लांब चालले तुझ्या पासून ..या आता आपल्या दुनियेत ! अंतरीचा सांगतो ! नको तो दुरावा !तू ही हरवशील. अशा एक ना अनेक बोध आपल्याला उठता, बसता, खाता, पिता ..जीवन जगताना …कोणत्याही क्षणी येतात ..त्यातली नकरात्मक बाब सोडून सकारात्मक विचार अंतरी घ्यावेत. स्वतःच स्वतःचा शोध घेऊन आपण स्वतःच बोधामृताचा वटवृक्ष बनू ! तो इतरांना ही जगण्यास प्रेरणादायी स्रोत बनेल !

सिंधू बनसोडे, इंदापूर, जि.पुणे

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles