
अवघ्या चोवीस तासात गुन्ह्याचा तपास; आरोपीस अटक
सतीश भालेराव
हिंगणा: शहरात घडलेल्या दुचाकी वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस हिंगणा पोलीस स्टेनच्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकार-यांनी अवघ्या २४ तासात गुन्ह्याचा तपास लावत आरोपीस अटक केली आहे.
हिंगणा येथील सुनील गंगाराम उमाटे वय 35 वर्ष, राहणार वार्ड नंबर 6 नेहरू शाळेजवळ हिंगणा हे दिनांक १२ जुलै रोजी आपल्या एक्टीवा बाईकने भाजीपाल्याचे दुकान बंद करून घरी गेले व घरी गेल्यानंतर गाडी घरासमोर बाहेर हँडल लॉक खराब असल्याने तसेच उभी करून घरी जेवण वगैरे करून झोपी गेले रात्री दिनांक 12/07/ 2022 चे 1.00 वाजता दरम्यान लघुशंकेसाठी उठून घराबाहेर आलेत तेव्हा त्यांनी त्यांची गाडी बघितली असता ती गाडी पार्क केलेल्या ठिकाणी त्यांना दिसून आली नाही.
आजूबाजूला शोध घेतले असता मिळून आली नाही. म्हणून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीचा व वाहनाचा सपोनि कुथे व पथक यांनी शोध घेत असताना एक इसम लाल कलरची एक्टिवाने मोहगाव फाट्याकडे जाताना दिसला त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले असता त्याने उडवा उडवी चे उत्तर दिले तसेच वर नमूद गुन्ह्यामधील तीच गाडी आरोपीकडे मिळून आली त्यामुळे सदर आरोपीला पोलीस स्टेशनला आणून अटक करण्यात आलेली आहे.
आरोपी आकाश अवधूतराव बनसोड वय 18 वर्ष राहतार बिहारी मोहल्ला वार्ड क्रमांक 16 गिरजा बारशामागे हिंगणा नागपूर यास अटक करून त्याच्याकडून वाहन जप्त करण्यात आले आहे.