मनसे दक्षिण पश्चिम नागपूर तर्फे वृक्षारोपण शिबिर संपन्न

मनसे दक्षिण पश्चिम नागपूर तर्फे वृक्षारोपण शिबिर संपन्न



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

गजानन ढाकुलकर, नागपूर

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दक्षिण पश्चिम विभाग नागपूर तर्फे नुकतेच सहकार नगर, गजानन धाम,करूनेश्र्वर मंदिर परिसर, स्मशान भूमी परिसर, सोनेगाव तलाव परिसर ,वॉकिंग स्ट्रीट परिसर या भागात एकूण बत्तीस जागी वृक्षारोपण करण्यात आले.

या मोहिमेत वड, पिंपळ,बदाम, गुलमोहर सप्तपर्णीचे रोपटे लावण्यात आले. आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मनसे पदाधिकारी यांनी सहकार नगर येथील करूनेश्र्वर मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन या उपक्रमास प्रारंभ केला.

मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंतभाऊ गडकरी, विदर्भाचे माजी रणजी क्रिकेट पटू योगेश घारे व मनोहर अगस्थी,शहर अध्यक्ष अजय ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

या वृक्षारोपण शिबिराचे आयोजन विभाग अध्यक्ष तुषार गिऱ्हे यांनी केले होते. कार्यक्रमात महिला सेना शहर अध्यक्षा संगीता सोनटक्के, विभाग उपाध्यक्ष चेतन बोरकुटे, प्रभाग अध्यक्ष शिरीष पटवर्धन ( गुरुजी), महिला सेना उपाध्यक्षा प्रिया बोरकुटे, शाखा अध्यक्ष रोशन इंगळे, साहिल बेहरे, महेश सातारकर, शशिकांत मांजरे व इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी वॉकिंग स्ट्रीट जवळील मनसे फलकाचे अनावरण सुद्धा करण्यात आले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles