वाडी नगर परिषदेच्या महिला कंत्राटी सफाई कामगाराना मनसेने दिला न्याय

वाडी नगर परिषदेच्या महिला कंत्राटी सफाई कामगाराना मनसेने दिला न्याय



पुढील लिंक वापरून WhatsApp गटामध्ये सामील व्हा : https://chat.whatsapp.com/GFPZ7vA0fjP6XRaFRqEeSD

अनिल पारखी, नागपूर

हिंगणा: तालुक्यातील वाडी नगर परिषदेत काम करणा-या 14 महिला सफाई कंत्राटी कामगार यांना टेंडर संपल्यामुळे कामावरून कमी करण्यात आले होते. त्यामुळे सफाई महिला आणि मनसेनी उपोषण सुरू केले होते. 16 दिवस उपोषण चालले नवीन व जुना मुख्याधिकारी यांच्यात वाद चालू होता, त्यामुळे त्या गरीब महिला 5 महिने घरी होत्या जेव्हा नवीन सिओ रुजू झाले तेव्हा टेंडर निघाला आणि त्या 14 महिलांना मनसेच्या प्रयत्नामुळे त्यांना कामावर घेतले.

उपोषण कालावधी मधील कंत्राटी सफाई महिलांना काम न करता दीड महिन्याचे वेतन मनसेचे प्रदेश सरचिटणीस मा हमंत भाऊ गडकरी, जिल्हा अध्यक्ष सतीश कोल्हे, तालुका अध्यक्ष अनिल पारखी ,तालुका संघटक दीपक ठाकरे व मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या संघर्षाने महिलांना न्याय भेटला आहे.

बाकी निम्मी लढाई बाकी आहे ती म्हणजे कामगार किमान वेतन कायद्याच्या तरतुदीनुसार वेतन 26 दिवसाचे 16160 रुपये महिना मिळाला पाहिजे शासकिय नियमानुसार pf व esic मिळाला पाहिजे ह्या मागण्या जोपर्यंत मान्य करीत नाही तो पर्यंत पाठपुरावा मनसे वाडी चे तालुका संघटक दीपक ठाकरे व मनसे तालुका अध्यक्ष अनिल पारखी व करीत राहील कंत्राटी सफाई कामगारांना न्याय मिळवेन देण्यासाठी कट्टीबद्ध राहणार आहेत.

ही जबाबदारी नगरसेवकांची सुध्दा आहे. हे विसरता कामा नये तुम्हाला जनता निवडून देते जनतेचे काम करण्यासाठी जनतेला न्याय देण्यासाठी जनतेवर होत अन्याय डोळे बंद करून पाहण्यासाठी नाही. किती नगरसेवक पुढाकार घेतात हे पुढे समजेलच की सफाई कामगारांच्या ठेकेदाराकडून कमिशन खाऊन चूप बसेल समोरच्या येणाऱ्या काळत दिसेलच व समजेल.

इतक्या वर्षापासून कंत्राटी सफाई कामगारांचे शोषण होत आहे नगरसेवकांनी आवाज का उचलला नाही ? हा प्रश्न सफाई कामगाराच्या मनात व वाडी येथील जनततेच्या मनात वादळ निर्माण करणारा आहे. आम्ही सर्वं वाडीतील जबाबदार समाजसेवक,नेते ,नगरसेवक, पत्रकार सर्वांनी प्रयत्न केले तर नप वाडी येथील सफाई कामगारांना 100% न्याय मिळऊन देऊ शकतो फक्त सर्वांची मानसिकता असायला हवी.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles